माजी आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत दुसऱ्यांदा कोरोना पॉझिटिव्ह
By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2021 06:37 PM2021-12-29T18:37:26+5:302021-12-29T18:38:31+5:30
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सूचनेनुसार त्यांना सावंत यांना डॉ.दीपक नामजोशी यांनी मोनोक्लोनल अँटीबॉडीज दिल्या होत्या.
मुंबई - राज्याचे माजी आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत हे दुसऱ्यांदा कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. त्यांचा कोरोना रिपोर्ट आज पॉझिटिव्ह आला. अंधेरी (पूर्व) येथील क्रिटीकेअर हॉस्पिटलमध्ये ते दाखल झाले असून सर्दी, खोकला, अंगदुखी व किंचीत ताप आल्याने त्यांनी कोविड टेस्ट केली होती. यापूर्वी १८ जून रोजी ते पहिल्यांदा कोरोना पॉझिटीव्ह आले होते. त्यावेळी त्यांनी कोरोनावर मात केली.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सूचनेनुसार त्यांना सावंत यांना डॉ.दीपक नामजोशी यांनी मोनोक्लोनल अँटीबॉडीज दिल्या होत्या. तर या हॉस्पिटलमध्ये त्यांना परत मोनोक्लोनल अँटीबॉडीज दिल्या असून आज ते जाऊन घरी विलगीकरण करणार आहेत. विशेष म्हणजे त्यांनी १६ जानेवारी व १६ फेब्रुवारी रोजी कोरोना प्रतिबंधक कोव्हीशिल्ड लसीचे दोन डोस घेतले होते. तरी आज पुन्हा दुसऱ्यांदा कोरोनाची लागण झाल्याने बूस्टर डोस घेण्याच्या आवश्यकतेवर आयसीएमआरने निकष ठरवणे गरजेचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. डॉ.दीपक सावंत यांनी कोरोनाच्या पहिल्या व दुसऱ्या लाटेत लिखाण केले आहे. मलम कोरोनाचे हे त्यांचे पुस्तक प्रकाशित झाले आहे. दरम्यान गेल्या आठ दिवसात त्यांच्या संपर्कात अललेल्यांनी कोरोना चाचणी करावी अशी विनंती त्यांनी केली आहे.