चांदीवाल आयोगाकडून माजी गृहमंत्री देशमुख यांना दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2021 04:06 AM2021-06-24T04:06:24+5:302021-06-24T04:06:24+5:30

प्रतिज्ञापत्र सादर करण्यात दिरंगाई; मुख्यमंत्री साहाय्यता निधीत ५ हजार जमा करण्याचे आदेश लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : होमगार्डचे ...

Former Home Minister Deshmukh fined by Chandiwal Commission | चांदीवाल आयोगाकडून माजी गृहमंत्री देशमुख यांना दंड

चांदीवाल आयोगाकडून माजी गृहमंत्री देशमुख यांना दंड

Next

प्रतिज्ञापत्र सादर करण्यात दिरंगाई; मुख्यमंत्री साहाय्यता निधीत ५ हजार जमा करण्याचे आदेश

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : होमगार्डचे महासमादेशक परमबीर सिंग यांनी केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपाबाबत चौकशी करणाऱ्या माजी न्या. चांदीवाल आयोगाने माजी गृहमंत्री व राष्ट्र्वादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अनिल देशमुख यांना ५ हजाराचा दंड ठोठावला. प्रतिज्ञापत्र मुदतीत सादर न केल्याने ही शिक्षा केली असून ही रक्कम तातडीने मुख्यमंत्री कोविड-१९ साहाय्यता निधीत जमा करण्याचे आदेश दिले.

माजी पाेलीस आयुक्त परमबीर सिंग यांना प्रतिज्ञापत्र मुदतीत सादर न केल्याने मंगळवारी ५ हजारांचा दंड ठाेठावण्यात आला होता. त्याच्या पंधरवड्यापूर्वी देशमुख यांनाही त्यांच्यावर केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपाबाबत प्रतिज्ञापत्र सादर करण्यासाठी समन्स बजाविण्यात आले होते. प्रतिज्ञापत्र मुदतीत सादर न केल्याने आयोगाने त्यांना ५ हजाराचा दंड ठाेठावला.

...............................

Web Title: Former Home Minister Deshmukh fined by Chandiwal Commission

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.