प्रतिज्ञापत्र सादर करण्यात दिरंगाई; मुख्यमंत्री साहाय्यता निधीत ५ हजार जमा करण्याचे आदेश
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : होमगार्डचे महासमादेशक परमबीर सिंग यांनी केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपाबाबत चौकशी करणाऱ्या माजी न्या. चांदीवाल आयोगाने माजी गृहमंत्री व राष्ट्र्वादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अनिल देशमुख यांना ५ हजाराचा दंड ठोठावला. प्रतिज्ञापत्र मुदतीत सादर न केल्याने ही शिक्षा केली असून ही रक्कम तातडीने मुख्यमंत्री कोविड-१९ साहाय्यता निधीत जमा करण्याचे आदेश दिले.
माजी पाेलीस आयुक्त परमबीर सिंग यांना प्रतिज्ञापत्र मुदतीत सादर न केल्याने मंगळवारी ५ हजारांचा दंड ठाेठावण्यात आला होता. त्याच्या पंधरवड्यापूर्वी देशमुख यांनाही त्यांच्यावर केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपाबाबत प्रतिज्ञापत्र सादर करण्यासाठी समन्स बजाविण्यात आले होते. प्रतिज्ञापत्र मुदतीत सादर न केल्याने आयोगाने त्यांना ५ हजाराचा दंड ठाेठावला.
...............................