...तर उद्धव ठाकरेंना तुम्ही मुख्यमंत्री का होऊ दिलं नाही?; कोळसे-पाटलांचा फडणवीसांना सवाल
By मुकेश चव्हाण | Published: February 3, 2021 04:45 PM2021-02-03T16:45:13+5:302021-02-03T16:49:22+5:30
देवेंद्र फडणवीस यांच्या या मागणीवरुन आता माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे-पाटील यांनी टीका केली आहे.
पुणे/ मुंबई: अलीगड मुस्लिम विद्यापीठाचा माजी विद्यार्थी शरजिल उस्मानी याने नुकत्याच पुण्यात आयोजित झालेल्या एल्गार परिषदेत हिंदू समाजाविरोधात आक्षेपार्ह आणि चिथावणीखोर विधान केल्याप्रकरणी राज्यात चांगलच वातावरण तापलं आहे. माजी मुख्यमंत्री आणि विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून शरजीलवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.
देवेंद्र फडणवीस यांच्या या मागणीवरुन आता माजी न्यायमूर्ती बी. जी. कोळसे-पाटील यांनी टीका केली आहे. राजधानी दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करणारेही हिंदूच आहेत. आमच्यार गुन्हे दाखल करायचे असतील तर करावे, असं कोळसे-पाटील यांनी म्हटलं आहे. तसेच देवेंद्र फडणवीस यांना हिंदुंचा एवढाच कळवळा आहे, तर मग उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री का होऊ दिलं नाही, असा सवालही कोळसे-पाटील यांनी उपस्थित केला आहे. त्याचप्रमाणे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होऊ नयेत म्हणून देवेंद्र फडणवीसांनी स्वत:चं मुख्यमंत्रीपद पणाला लावलं, असा आरोपही कोळसे-पाटील यांनी केला आहे.
शरजिल उस्मानी याला मनुवादी म्हणायचे होते, त्याऐवजी त्याने हिंदु शब्द प्रयोग वापरला. त्यामुळे कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी माफी मागतो, असंही कोळसे- पाटील यांनी सांगितले.
दरम्यान, एल्गार परिषदेचे पुण्यात शनिवारी ३० जानेवारी रोजी आयोजन केले होते. त्यात अलिगढ मुस्लिम विद्यापीठाचे शरजिल उस्मानी यांचे भाषण झाले होते. त्यात त्याने हिंदुविषयी आपत्तीजनक व भडकावू विधाने केल्याने पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
वक्तव्य तपासल्यानंतरच कारवाई - गृहमंत्री
पुण्यातील एल्गार परिषदेत काही आक्षेपार्ह वक्तव्य करण्यात आले किंवा नाही याबाबतचा व्हिडीओ मागविण्यात आला आहे. आक्षेपार्ह वक्तव्य तपासले जात आहे. त्यानंतरच पुढची कारवाई केली जाईल, असे राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितले. त्या कार्यक्रमातील भाषणाचा व्हिडीओ मागविला आहे. त्याची रीतसर तपासणी करू. त्यानंतर काही आक्षेपार्ह आढळले तर कारवाई करू, असे देशमुख यांनी सांगितले.
नेमकं शरजील काय म्हणाला-
‘आज का हिन्दू समाज, हिंदुस्तान में हिंदू समाज बुरी तरीके से सड़ चुका है। ये जो लोग लिंचिंग करते हैं, कत्ल करते है, ये कत्ल करने के बाद अपने घर जाते है तो क्या करते होंगे अपने साथ? कोई नए तरीके से हात धोते होंगे, कुछ दवा मिलाकर नहाते होंगे। क्या करते है ये लोग की वापस आकर हमारे बीच खाना खाते है, उठते-बैठते है, फिल्में देखते है। अगले दिन फिर किसीको पकड़ते है फिर कत्ल करते और नॉर्मल लाईफ जीते है। अपने घर में मोहब्बत भी कर रहे है, अपने बाप का पैर भी छू रहे है, मंदिर में पूजा भी कर रहे है, फिर बाहर आकर यही करते है...’, असे वक्तव्य एल्गार परिषदेतील भाषणात शरगीलने केले होते.