माजी विरोधी पक्षनेत्याचा आज सेनेत प्रवेश
By admin | Published: January 29, 2017 03:45 AM2017-01-29T03:45:14+5:302017-01-29T03:45:14+5:30
काँग्रेसमधील गटातटांचे राजकारण विकोपाला पोहोचले असून एक-एक मोहरे गळू लागले आहेत. माजी विरोधी पक्षनेते देवेंद्र आंबेरकर पक्षाला सोडचिठ्ठी देऊन रविवारी शिवसेनेत
मुंबई : काँग्रेसमधील गटातटांचे राजकारण विकोपाला पोहोचले असून एक-एक मोहरे गळू लागले आहेत. माजी विरोधी पक्षनेते देवेंद्र आंबेरकर पक्षाला सोडचिठ्ठी देऊन रविवारी शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.
आतापर्यंत नगरसेविका वकारुन्नीसा अन्सारी, याकूब मेहमन, सागर सिंह ठाकूर, परिमंदर सिंग भामरा, भौम सिंग राठोड, माजी आमदार कृष्णा हेगडे यांनी काँग्रेसला जय महाराष्ट्र केला आहे. आंबेरकर हे कामत गटाचे म्हणून ओळखले जातात. मुंबई कॉँग्रेसवर कामत गटाचे वर्चस्व असताना त्यांची वर्णी विरोधी पक्षनेतेपदी लागली होती. निरुपम यांचा वरदहस्त असल्याने प्रवीण छेडा यांना गेल्या वर्षी विरोधी नेतेपद देत आंबेरकर यांची तडकाफडकी उचलबांगडी करण्यात आली होती. आता निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गटातटाचे राजकारण उफाळून आले. कामत गटातील अनेक नगरसेवक पक्ष सोडणार असल्याची सर्वप्रथम बातमी ‘लोकमत’ने दिली होती. (प्रतिनिधी)