अनिल देशमुख यांच्या अडचणींत वाढ, माफीचा साक्षीदार बनण्यास वाझेला ED ची मंजुरी

By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2022 06:41 AM2022-07-10T06:41:57+5:302022-07-10T06:43:14+5:30

बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे याला माफीचा साक्षीदार होण्यासाठी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) परवानगी दिली आहे.

former minister Anil Deshmukh in trouble sachin waze ED approves to witness apology | अनिल देशमुख यांच्या अडचणींत वाढ, माफीचा साक्षीदार बनण्यास वाझेला ED ची मंजुरी

अनिल देशमुख यांच्या अडचणींत वाढ, माफीचा साक्षीदार बनण्यास वाझेला ED ची मंजुरी

Next

मुंबई : मनसुख हिरेन हत्या प्रकरण आणि अँटिलिया स्फोटक प्रकरणात कोठडीत असणाऱ्या बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे याला माफीचा साक्षीदार होण्यासाठी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) परवानगी दिली आहे. १०० कोटी रुपयांच्या वसुली प्रकरणात माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याविरोधात माफीचा साक्षीदार बनण्याची तयारी वाझेने दर्शवली होती. ईडीच्या परवानगीमुळे अनिल देशमुख यांच्या अडचणींत वाढ झाली आहे. 

देशमुख व त्यांचे स्वीय सचिव संजीव पलांडे व स्वीय सहायक कुंदन शिंदे हे आर्थिक गैरव्यवहार प्रकरण व भ्रष्टाचाराप्रकरणी आरोपी आहेत. सीबीआय तपास करत असलेल्या भ्रष्टाचार प्रकरणातही सचिन वाझेला विशेष सीबीआय न्यायालयाने माफीचा साक्षीदार केला आहे. सीबीआयनेही त्याला सारखीच अट घातली आहे. गुन्ह्याबाबत असलेली सर्व माहिती व प्रत्येक आरोपीची त्यातील भूमिकेविषयी स्पष्ट व खरी माहिती देण्याची अट वाझेला घालण्यात आली आहे. तपासादरम्यान जमा केलेल्या मौखिक व कागदोपत्री पुरावे व वाझे याने दिलेला जबाब, हे एकमेकांची पुष्टी करत आहेत. काही ठिकाणी त्याचा जबाब अगदी महत्त्वाचा आहे. वाझेने देशमुखांचा साथीदार म्हणून काम केले आहे, हे लक्षात घेणे आवश्यक आहे, असे ईडीने वाझेच्या अर्जावर उत्तर देताना म्हटले आहे. 

वसुलीद्वारे आलेल्या पैशांवर देखरेख व ते देशमुखांकडे सोपवण्याची पालांडे व शिंदे यांच्या कार्यपद्धतीची माहिती वाझेला होती. देशमुख १०० कोटी वसुलीच्या कटातील मुख्य सूत्रधार आहेत, असे ईडीने  उत्तरात म्हटले आहे. आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी माफीचा साक्षीदार होण्यासाठी वाझेने ९ जून रोजी विशेष न्यायालयात अर्ज केला होता. ईडीने त्यावर उत्तर दाखल केले. विशेष न्यायालयाने या अर्जावरील सुनावणी २१ जुलै रोजी ठेवली आहे. संबंधित गुन्ह्यांत आरोपीची भूमिका व अन्य आरोपींची भूमिका आरोपीने स्पष्ट करण्याच्या अटीवरच त्याचा माफीचा साक्षीदार बनण्याचा अर्ज मंजूर करण्यास तपास यंत्रणेला हरकत नाही. 

Web Title: former minister Anil Deshmukh in trouble sachin waze ED approves to witness apology

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.