माजी आमदार अवधूत तटकरे भाजपमध्ये; कोकणात ठाकरेंना लवकरच आणखी धक्के बसतील: बावनकुळे

By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2022 05:43 AM2022-10-15T05:43:39+5:302022-10-15T05:44:20+5:30

राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते खासदार सुनील तटकरे यांचे पुतणे, माजी आमदार अवधूत तटकरे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.

former mla avdhoot tatkare joins bjp in konkan uddhav thackeray will soon faces another setback said chandrashekhar bawankule | माजी आमदार अवधूत तटकरे भाजपमध्ये; कोकणात ठाकरेंना लवकरच आणखी धक्के बसतील: बावनकुळे

माजी आमदार अवधूत तटकरे भाजपमध्ये; कोकणात ठाकरेंना लवकरच आणखी धक्के बसतील: बावनकुळे

Next

लोकमत न्यूज नेटवर्क 

मुंबई: राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते खा. सुनील तटकरे यांचे पुतणे, माजी आमदार अवधूत तटकरे तसेच मीरा भाईंदरच्या तीन नगरसेवकांनी शुक्रवारी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला.

अवधूत हे २०१४ मध्ये रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धनचे आमदार होते. त्यापूर्वी ते रोह्याचे नगराध्यक्षही होते. २०१९ मध्ये ते शिवसेनेत गेले. पण, त्यांच्याऐवजी विनोद घोसाळकर यांना उमेदवारी दिली होती. सुनील तटकरे यांच्या कन्या अदिती या सध्या श्रीवर्धनच्या आमदार आहेत. बावनकुळे यांनी यावेळी, कोकणात ठाकरेंना लवकरच आणखी धक्के बसतील, असा दावा केला.

२०१४ च्या पेण विधानसभा निवडणुकीत खा. सुनील तटकरे यांचे थोरले बंधू आणि अवधूत तटकरे यांचे वडील अनिल तटकरे यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी असतानाही पेणमधून आघाडीच्या विरोधात निवडणूक लढविली होती. या उमेदवारीमुळे झालेल्या मतविभागणीचा फटका बसून आघाडीचे उमेदवार माजी मंत्री रवींद्र पाटील यांचा पराभव झाला होता. त्यावेळी कौटुंबिक वाद झाल्याचा आरोप रवी पाटील यांनी केला होता. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: former mla avdhoot tatkare joins bjp in konkan uddhav thackeray will soon faces another setback said chandrashekhar bawankule

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :BJPभाजपा