Join us

राष्ट्रवादीमध्ये जोरदार इनकमिंग, सहकार क्षेत्रातील मोठ्या नेत्याने अजितदादांच्या उपस्थितीत हाती बांधले घड्याळ

By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2020 11:08 AM

गेल्या काही दिवसांमध्ये विविध पक्षांमधील अनेक नेते आणि कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर आज सहकार क्षेत्रातील मोठ्या नेत्याने हाती घड्याळ बांधले आहे.

ठळक मुद्देसहकार क्षेत्रातील आघाडीच्या नावांपैकी एक असलेल्या सीताराम घनदाट यांचा राष्ट्रवादीत प्रवेशअजित पवार आणि जयंत पाटील यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांसह केला राष्ट्रवादीत प्रवेश सीताराम घनदाट अभ्युदय सहकारी बँकेचे मानद अध्यक्ष

मुंबई - महाविकास आघाडीच्या माध्यमातून राज्याच्या सत्तेत पुनरागमन केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जोरदार इनकमिंगला सुरुवात झाली आहे. गेल्या काही दिवसांमध्ये विविध पक्षांमधील अनेक नेते आणि कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर आज सहकार क्षेत्रातील मोठ्या नेत्याने हाती घड्याळ बांधले आहे.सहकार क्षेत्रातील आघाडीच्या नावांपैकी एक असलेल्या सीताराम घनदाट यांनी आज उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. माजी आमदार घनदाट यांनी परभणीमधील गंगाखेड मतदारसंघाचे विधानसभेत प्रतिनिधित्व केले होते. तसेच ते अभ्युदय सहकारी बँकेचे मानद अध्यक्ष आहेत. राष्ट्रवादीचा मनसे, भाजपाला एकाचवेळी धोबीपछाड, बड्या नेत्यांनी हाती बांधले घड्याळ मनसेच्या सांस्कृतिक विभागाचे ठाणे, रायगड, पालघर संपर्कप्रमुख डॉ. ओमकार हरी माळी आणि उद्योजक पंकज सिन्हा यांनी गेल्या आठवड्यात प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत तर नंदुरबार जिल्ह्यातील भाजपाचे माजी आमदार उदयसिंग पाडवी यांनी आपल्या अनेक कार्यकर्त्यांसह उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला होता.यावेळी राज्याचे जलसंपदा मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे, प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, आमदार अमोल मिटकरी, प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदूराव, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, युवक कार्याध्यक्ष सूरज चव्हाण, राष्ट्रवादी युवक नंदुरबार जिल्हाध्यक्ष सागर तांगुळी, राष्ट्रवादी काँग्रेस नंदुरबार महिला जिल्हाध्यक्षा हेमलता पाटील उपस्थित होते. सिनेमातील दगडू शांताराम परबची राजकारणात एन्ट्री; मराठीतील सिनेकलाकारांचा राष्ट्रवादीत प्रवेशयापूर्वी मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्गज कलाकारांनी  राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांच्या उपस्थितीत मुंबई प्रदेश कार्यालयात जाहीर प्रवेश केला होता. मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज ज्येष्ठ अभिनेत्री सविता मालपेकर, माया जाधव, ज्येष्ठ अभिनेते विजय पाटकर, लेखक, दिग्दर्शक आणि अभिनेता दगडू फेम प्रियदर्शन जाधव, लेखक कौस्तुभ सावरकर, दिग्दर्शक संतोष भांगरे, अभिनेते गिरीश परदेशी, बाळकृष्ण शिंदे, निर्माता शाम राऊत, अभिनेते डॉ. सुधीर निकम, उमेश बोळके, मोहित नारायणगावकर आदींसह इतर सहकलाकारांचा समावेश होता. 

इतर महत्त्वाच्या बातम्या 

ही पथ्यं पाळा आणि तंदुरुस्त व्हा, कोरोनामुक्त रुग्णांना आरोग्य मंत्रालयाने दिले १० खास सल्ले

शेतकऱ्यांसाठी सरकारने आणली भरघोस नफा मिळवून देणारी योजना, मिळेल ८० टक्क्यांपर्यंत सब्सिडी

पँगाँगमध्ये चिनी सैन्याला सळो की पळे करणाऱ्या स्पेशल फ्रंटियर फोर्सची ही आहे खास वैशिष्टे 

म्हणून पँगाँगमध्ये ब्लॅक टॉप आहे सामरिकदृष्ट्या महत्त्वाचा, तेथील भारताच्या वर्चस्वामुळे चीनचा होतोय तीळपापड 

…तर चीनने भारतावर लष्करी कारवाई करावी, ९० टक्के चिनी जनतेची इच्छा 

टॅग्स :राष्ट्रवादी काँग्रेसराजकारणअजित पवारमुंबई