मुंबई- तीन दिवसांपूर्वी पोलीस दलातून निवृत्त झालेले मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांना ईडीने समन्स बजावले आहे. ५ जुलै रोजी संजय पांडे यांना ईडीने चौकशीसाठी बोलवण्यात आले आहे.
ईडीने कोणत्या कारणावरून त्यांना चौकशीसाठी समन्स बजावलं आहे ते अद्याप समोर आलेलं नाही. परंतु ते मुंबई पोलीस आयुक्त पदाची धुरा सांभाळताना त्यांच्यावर भाजपकडून आरोप केले जात होते.संजय पांडे १९८६च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहे. महाराष्ट्रातील सर्वात वरिष्ठ अधिकाऱ्यांपैकी संजय पांडे एक आहेत.
संजय पांडे यांची कारकीर्द-
- आयआयटी कानपूरमधून इंजिनीअरिंग केले. (आयटी कम्प्युटर)
- १९८६ च्या बॅचमधील आयपीएस अधिकारी.
- पुण्यात सहाय्यक पोलीस आयुक्त म्हणून पार पाडली पहिली जबाबदारी.
- मुंबईत चार हायप्रोफाईल पोलीस स्टेशनच्या झोन ८ चे पांडे यांनी पहिले डीसीपी म्हणून काम पाहिले.
- सन १९८८ मध्ये हॉवर्ड विद्यापीठात पदव्युत्तर शिक्षण घेतले.
- सन १९९९ मध्ये SPG मध्ये माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या सुरक्षेत तैनात.
- सन २००१ मध्ये दिला राजीनामा. तो मंजूर न झाल्याने प्रकरण कोर्टात.
- सन २००५ मध्ये सेवेत पुन्हा रुजू
- कारकीर्दीतील तब्बल २० वर्षांच्या सेवेनंतर व्यक्त केली स्वेच्छानिवृत्तीची इच्छा.
- सन २०११ मध्ये पुन्हे सेवेत रुजू.
- सन २०१५ मध्ये होमगार्डचे अतिरिक्त पोलीस महासंचालकपदी नियुक्ती. नंतर महासंचालकही झाले.
- अँटिलिया स्फोटक प्रकरणानंतर संजय पांडे यांच्या जागी परमबीर सिंह यांची नियुक्ती झाल्यानंतर पांडे यांच्याकडे महाराष्ट्र राज्य सुरक्षा परिषदेची जबाबदारी.
- ९ एप्रिल रोजी संजय पांडे यांच्याकडे राज्याच्या पोलिस महासंचालकपदाचा अतिरिक्त कार्यभार आला.