सावंत हत्येप्रकरणी माजी पोलिसास अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2018 05:05 AM2018-01-16T05:05:45+5:302018-01-16T05:05:55+5:30

माजी नगरसेवक अशोक सावंत यांच्या हत्येप्रकरणी एका माजी पोलीस कर्मचाºयाला समतानगर पोलिसांनी रविवारी रात्री अटक केली आहे.

Former policeman arrested in Sawant murder case | सावंत हत्येप्रकरणी माजी पोलिसास अटक

सावंत हत्येप्रकरणी माजी पोलिसास अटक

Next

मुंबई : माजी नगरसेवक अशोक सावंत यांच्या हत्येप्रकरणी एका माजी पोलीस कर्मचाºयाला समतानगर पोलिसांनी रविवारी रात्री अटक केली आहे. दीपक हनवते (५०) असे अटक माजी पोलिसाचे नाव आहे. हनवतेवर सावंत हत्याप्रकरणातील सूत्रधाराला आश्रय दिल्याचा आरोप आहे.
दहिसरच्या केतकीपाडा परिसरात हनवते कुटुंबीयांसोबत राहतो. तो एएसआय होता. त्याने २०१२ मध्ये स्वेच्छानिवृत्ती घेऊन स्वत:ची एक सिक्युरिटी एजन्सी सुरु केली होती. सावंत यांची हत्या केल्यानंतर अनिल वाघमारे दहिसरच्या केतकीपाडामध्ये तीन दिवस थांबला होता. त्याठिकाणी त्याला लपण्यास मदत करण्यामध्ये हनवतेचा हात असल्याचे उघड झाले आहे. केतकीपाडामध्ये हनवतेने वाघमारेला एक खोली घेऊन दिली होती. मात्र पोलीस त्याच्यापर्यंत पोहोचणार हे लक्षात आल्यानंतर हनवतेने दोन हजार रुपये देऊन वाघमारेला नाशिकला ओळखीच्या एका व्यक्तीकडे पाठवून दिले. मात्र त्या व्यक्तीने वाघमारेची मदत केली नाही, असेही तपासात उघड झाले आहे. त्याला दहिसरमधूनच अटक करण्यात आल्याचे समतानगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल माने यांनी सांगितले. हनवतेच्या अटकेनंतर अटक आरोपींची संख्या सहा झाली आहे. हनवतेला १८ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
दरम्यान सावंत यांच्या हत्येनंतर एका नामांकित बिल्डरच्या हत्येचा कट वाघमारेने रचला होता. त्या बिल्डरला धडा शिकविण्यास सावंत यांचा काटा काढल्याचे त्याने सांगितले. माहितीचा आधार वापरत त्याने बिल्डरबाबत काही माहिती मिळविली होती. त्याचा वापर करत तो बिल्डरला ब्लॅकमेल करत होता. त्यानुसार हा बिल्डर वाघमारेने मागितलेली रक्कम देण्यास तयार झाला. मात्र सावंत यांच्या मध्यस्थीमुळे वाघमारेला माघार घ्यावी लागली होती. सध्या फरार असलेला जगदीश पवार ऊर्फ जग्गा हा केबल व्यवसायात सावंत यांच्यासोबत होता. मात्र वाघमारेला सहकार्य केल्याने पवारलादेखील नोकरीतून काढून टाकण्यात आले होते. त्यामुळे सावंत यांना ठार मारण्याच्या कटात तो सहभागी झाला.

Web Title: Former policeman arrested in Sawant murder case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Arrestअटक