माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या पुतळ्याचे कांदिवलीत झाले अनावरण

By मनोहर कुंभेजकर | Published: August 13, 2022 08:12 PM2022-08-13T20:12:01+5:302022-08-13T20:12:21+5:30

Atal Bihari Vajpayee: देशाचे माजी पंतप्रधान भारतरत्न दिवंगत अटल बिहारी वाजपेयी यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे आज सायंकाळी कांदिवलीत अनावरण झाले.

Former Prime Minister Atal Bihari Vajpayee's statue unveiled at Kandivali | माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या पुतळ्याचे कांदिवलीत झाले अनावरण

माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या पुतळ्याचे कांदिवलीत झाले अनावरण

Next

मुंबई - देशाचे माजी पंतप्रधान भारतरत्न दिवंगत अटल बिहारी वाजपेयी यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे आज सायंकाळी कांदिवलीत अनावरण झाले. आज दुपारी 3.30 वाजता दहिसर चेक नाक्यावरून वाजपेयी यांच्या पुतळ्याची वाजत गाजत ढोल ताशांच्या गजरात सजवलेल्या रथावरून ही यात्रा निघाली.या दरम्यान भाजप कार्यकर्त्यांनी ठिकठिकाणी वाजपेयी यांच्या पुतळ्यावर पुष्पवृष्टी केली.

सुमारे तीन तासांच्या मिरवणुकीनंतर सायंकाळी 6.30  वाजता सदर पुतळा कांदिवली (पूर्व), आकुर्ली रोड, समता नगर पोलीस चौकीजवळील भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी उत्कृष्टता केंद्रच्या (सेंटर ऑफ एक्सलन्स) संकुलात आणण्यात आला.क्रेनवरून 7.30 च्या सुमारास सुरक्षित चबुतऱ्यांवर ठेवल्यावर येथें या पुतळ्याचे अनावरण झाले.आणि भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. उत्तर मुंबईचे खासदार गोपाळ शेट्टी यांच्या गेल्या दीड वर्षांच्या अथक प्रयत्नानंतर सुमारे पावणे दोन टनाचा सदर भव्य पुतळा आज साकारला. यावेळी आमदार अतुल भातखळकर,आमदार योगेश सागर,आमदार मनीषा चौधरी,आमदार सुनील राणे,उत्तर मुंबई भाजप अध्यक्ष गणेश खणकर,उत्तर मुंबईचे भाजप माजी नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

तत्कालीन महाआघाडी सरकार आणि त्यांचे प्रशासकीय अधिकारी यांनी सर्व परवानग्या मिळून सुद्धा वाजपेयी यांच्या पुतळ्याला परवानगी नाकारली होती.यासाठी आपण सुमारे दीड वर्षे लढा दिला.भारतरत्न वाजपेयी यांच्या पुतळ्याला विरोध करणाऱ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांना जाब विचारला पाहिजे असे त्यांनी आवाहन केले. राज्यात सत्तातर होताच वाजपेयी यांच्या पुतळ्याच्या अनावरणाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परवानगी दिली आणि आज वाजपेयी यांच्या पुतळ्याचे अनावरण झाले अशी माहिती खासदार शेट्टी यांनी दिली.

Web Title: Former Prime Minister Atal Bihari Vajpayee's statue unveiled at Kandivali

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.