Join us

भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर अवधुत तटकरेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2022 1:02 PM

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेला लागलेली गळती अजुनही थांबलेली नाही. शिवसेनेतील फुटीनंतर राज्यभरातील नेत्यांनी एकनाथ शिंदे गटात प्रवेश केला. आज शिवसेनेचे माजी आमदार अवधुत तटकरे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

मुंबई: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेला लागलेली गळती अजुनही थांबलेली नाही. शिवसेनेतील फुटीनंतर राज्यभरातील नेत्यांनी एकनाथ शिंदे गटात प्रवेश केला. आज शिवसेनेचे माजी आमदार अवधुत तटकरे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या गटाला मोठा धक्का बसला आहे. भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर अवधुत तटकरे यांनी प्रतिक्रिया दिली. " मी कोणत्याही दबावाला बळी पडलेलो नाही. सर्व कार्यकर्त्यांच्या मर्जीने मी भाजपमध्ये प्रवेश केला आहे, अशी प्रतिक्रिया माजी आमदार अवधुत तटकरे यांनी दिली आहे. 

बऱ्याच दिवसापूर्वी मी कार्यकर्त्यांसोबत बैठक घेतली होती. यावेळी आमचे भाजपमध्ये प्रवेश करण्या संदर्भात निर्णय झाला होता. भाजपची सध्या देशात एकहाती सत्ता आहे. त्यामुळे जिल्ह्याचा या मार्फत विकास होणार आहे. भाजपमध्ये प्रवेशासाठी माझ्यावर कोणताही दबाव नव्हता, असंही माजी आमदार अवधुत तटकरे म्हणाले.  

ठाणे जिल्ह्यातील बडा नेता शिंदे गटात, काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादीला दिली होती सोडचिठ्ठी, आता शिंदेंनी सोपवली मोठी जबाबदारी 

रोहा-श्रीवर्धन मतदारसंघातील माजी आमदार अवधुत तटकरे यांचा आज भाजपमध्ये पक्षप्रवेश झाला. अवधुत तटकरे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते खासदार सुनील तटकरे यांचे पुतणे आहेत. त्यांनी २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत रोहा-श्रीवर्धन मतदारसंघातून विजय मिळवला होता.

दरम्यान, २०१९ मध्ये या मतदारसंघातून अदिती तटकरे निवडून आल्या होत्या. त्यामुळे आता अवधुत तटकरे यांना पक्षात घेऊन अदिती तटकरे यांना भाजपा आव्हान देऊ शकतो. अवधुत तटकरे यांनी २०१९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची साथ सोडून शिवसेनेत प्रवेश केला होता. तेव्हापासून ते शिवसेनेत होते. 

टॅग्स :भाजपाशिवसेनाउद्धव ठाकरेदेवेंद्र फडणवीस