जेडीयूचे माजी प्रदेश अध्यक्ष आणि कामगार नेते शशांक राव यांचा भाजपत प्रवेश

By रेश्मा शिवडेकर | Published: May 2, 2024 01:23 AM2024-05-02T01:23:18+5:302024-05-02T01:24:10+5:30

जानेवारी महिन्यात जनता दल युनायटेडचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष पदाचा व पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा राव यांनी दिला होता.

Former state president of JDU and labor leader Shashank Rao joins BJP | जेडीयूचे माजी प्रदेश अध्यक्ष आणि कामगार नेते शशांक राव यांचा भाजपत प्रवेश

जेडीयूचे माजी प्रदेश अध्यक्ष आणि कामगार नेते शशांक राव यांचा भाजपत प्रवेश


मुंबई : जेडीयूचे माजी प्रदेश अध्यक्ष आणि कामगार नेते शशांक राव यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला. जानेवारी महिन्यात जनता दल युनायटेडचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष पदाचा व पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा राव यांनी दिला होता. 

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कामाने प्रेरित होऊन आणि त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत प्रवेश करत आहे. यामुळे कामगारांचे प्रश्न सोडविण्यास अधिक सुलभता येईल मी योग्य निर्णय घेतला आहे, अशी भावना शशांक राव यांनी व्यक्त केली. तसेच भारतीय जनता पार्टीच्या विचारांनी प्रेरित होऊन आणि होत असलेल्या विकासकामांवर विश्वास ठेऊन भाजपात पक्षप्रवेश केला आहे, असेही राव म्हणाले. 

यावेळी, खासदार पीयुष गोयल, खासदार मनोज कोटक, खासदार गोपाळ शेट्टी, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, आमदार आशिष शेलार, आमदार प्रवीण दरेकर उपस्थित होते.
 

Web Title: Former state president of JDU and labor leader Shashank Rao joins BJP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.