Join us

सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्टचे संस्थापक माधवराव भिडे यांचे अल्पशा आजाराने निधन

By ऑनलाइन लोकमत | Published: July 07, 2018 4:58 PM

मराठी बिझनेस नेटवर्किंगचे पितामह आणि सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्टचे संस्थापक माधवराव भिडे यांचे आज शनिवार ७ जुलै २०१८ रोजी मुंबई येथील खासगी रुग्णालयात अल्पशा आजाराने निधन झाले.

मुंबई- मराठी बिझनेस नेटवर्किंगचे पितामह आणि सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्टचे संस्थापक माधवराव भिडे यांचे आज शनिवार ७ जुलै २०१८ रोजी मुंबई येथील खासगी रुग्णालयात अल्पशा आजाराने निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय ८६ होते. त्यांच्या पश्चात पत्नी डॉ. इरावती, पुत्र सुहास व राजीव, दोन स्नुषा, नातवंडे व हजारो मराठी उद्योजक आहेत.रेल्वेमधून चीफ इंजिनीअर म्हणून निवृत्त झाल्यावर त्यांनी भिडे असोसिएट्स नावाने स्वत:ची कंपनी सुरू केली. मराठी उद्योजकांना एकत्र आणण्यासाठी सन २००० मध्ये त्यांनी सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्ट या संस्थेची स्थापना केली. या संस्थेचे ४५हून अधिक चॅप्टर असून, १७०० हून अधिक उद्योजक सदस्य आहेत. भिडे यांनी १९८९ साली इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ ब्रिज इंजिनीअर्स या सेतू उभारणाऱ्या अभियंत्यांची संस्था उभारली. माधवराव भिडे यांच्या जाण्याने मराठी उद्योजक पोरका झाल्याची भावना सर्व स्तरांतून व्यक्त केली जात आहे.