घरफोडी करणाऱ्या चौघांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 04:12 AM2021-01-08T04:12:43+5:302021-01-08T04:12:43+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : लॉकडाऊनचा फायदा घेत घरफोडी करणाऱ्या चौघांना बुधवारी अटक करण्यात आली. दहिसर पोलिसांनी ही कारवाई ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : लॉकडाऊनचा फायदा घेत घरफोडी करणाऱ्या चौघांना बुधवारी अटक करण्यात आली. दहिसर पोलिसांनी ही कारवाई केली असून ते अभिलेखावरील गुन्हेगार असल्याचे उघड झाले आहे.
अब्दुल अन्सारी ऊर्फ बाबू (२५), शमीम विश्वास ऊर्फ विक्की (२९), रेसल लुजरियो (२४) आणि जोहर अली मेहबुब अली (२०) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. दहिसर परिसरात बंद घरांची रेकी करून नंतर त्याठिकाणी घरफोडी करण्याची त्यांची कार्यपद्धती आहे. नवीन वर्ष साजरे करण्यासाठी त्यांना पैशांची आवश्यकता होती. मात्र, लॉकडाऊनदरम्यान सर्वत्र पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त होता. त्यामुळे त्यांना संधी मिळाली नाही. मात्र, त्यानंतर २९ डिसेंबर रोजी त्यांनी संधी साधत बाभळीपाड्यात बंद असलेल्या एका घरात शिरून जवळपास एक लाख ७७ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला.