Join us

मध्य रेल्वेच्या चार महिला खेळाडूंची टोकियो ऑलिम्पिकसाठी भारतीय हॉकी संघात निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2021 4:06 AM

१६ सदस्यांपैकी १३ महिला खेळाडू भारतीय रेल्वेमध्ये कार्यरतलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : टोकियो ऑलिम्पिक-२०२१मध्ये भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी मध्य ...

१६ सदस्यांपैकी १३ महिला खेळाडू भारतीय रेल्वेमध्ये कार्यरत

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : टोकियो ऑलिम्पिक-२०२१मध्ये भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील चार खेळाडूंची राष्ट्रीय महिला हॉकी संघात निवड झाली आहे. टोकियो ऑलिम्पिकमध्ये खेळणाऱ्या भारतीय महिला हॉकी संघातील १६ सदस्यांची घोषणा करण्यात आली आहे. या संघात मध्य रेल्वेच्या चार खेळाडूंचा समावेश आहे. १६ सदस्यांच्या भारतीय महिला हॉकी संघातील १३ खेळाडू भारतीय रेल्वेमध्ये कार्यरत आहेत.

मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात तिकीट तपासणी संवर्गात काम करणाऱ्या हेड टीसी मोनिका मलिक, हेड टीसी वंदना कटारिया, हेड टीसी सुशीला चानू पुखरांबम् आणि हेड टीसी रजीनी एतिमारपू यांची भारतीय ऑलिम्पिक महिला हॉकी संघात स्टँड-इन गोल कीपर म्हणून निवड झाली आहे. या खेळाडू गेल्या काही वर्षांपासून मध्य रेल्वेकडून खेळत आहेत. यांच्या प्रशिक्षक हेलन मेरी (अर्जुन पुरस्कारप्राप्त) आणि सरिता ग्रोव्हर असून, त्या मध्य रेल्वेत कार्यरत असून, राष्ट्रीय हॉकीपटू होते.

...........................................