पालिकेला चार कोटींचा गंडा
By admin | Published: April 5, 2016 02:04 AM2016-04-05T02:04:09+5:302016-04-05T02:04:09+5:30
पे अॅण्ड पार्कचा यशस्वी ठरलेला ए विभागातील प्रयोग म्हणजे प्रत्यक्षात पालिकेला कोट्यवधी रुपयांचा गंडा असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे़ पालिकेच्या दक्षता खात्यानेच (टावो) चौकशीतून असा निष्कर्ष
मुंबई : पे अॅण्ड पार्कचा यशस्वी ठरलेला ए विभागातील प्रयोग म्हणजे प्रत्यक्षात पालिकेला कोट्यवधी रुपयांचा गंडा असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे़ पालिकेच्या दक्षता खात्यानेच (टावो) चौकशीतून असा निष्कर्ष
काढला आहे़ या प्रकरणी जबाबदार अधिकारी व तीन ठेकेदारांवर फौजदारी गुन्हा दाखल करा व दंडासहित रक्कम वसूल करण्याची शिफारस टावोने केली आहे़
पे अॅण्ड पार्कमध्ये वाहनचालकांकडून दामदुप्पट पैसा उकळण्यात येत असल्याचा आरोप झाल्यानंतर पालिकेने नवीन योजना आणली़ याचा प्रयोग ए विभागात म्हणजेच कुलाबा, फोर्ट, चर्चगेटमध्ये झाला़ या ठिकाणी तीन ठेकेदारांना पे अॅण्ड पार्कचा ठेका बोली लावून देण्यात आला़ त्यानुसार या ठेकेदारांकडून अनामत रक्कम डिमांड ड्राफ्ट स्वरूपात घेणे अपेक्षित होते़
मात्र, या ठेकेदारांनी धनादेश दिले़ हे धनादेश प्रत्यक्षात वटलेच नाहीत़ या प्रकरणी पालिकेच्या दक्षता खात्याने केलेल्या चौकशीत ए विभागातील दुय्यम अभियंता मिलन मेहता याच्यावर ठपका ठेवण्यात आला आहे़ असा सुमारे चार कोटी ५९ हजार रुपयांचा हा घोळ आहे़ या प्रकरणी ठेकेदार आणि अधिकाऱ्यांवर कारवाईची शिफारसही दक्षता खात्याने केली आहे़ (प्रतिनिधी)
> अधिकाऱ्यांच्या संगनमताने ठेकेदार मेसर्स राज एंटरप्रायजेस, मेसर्स कामेश क्रिएशन, मेसर्स ग्लोबल पॉवर सिस्टम्स यांनी न भरलेल्या अनुज्ञापन शुल्क व या अनुज्ञापन शुल्कापोटी भरलेले धनादेश न वटल्यामुळे पालिकेचे चार कोटी ५९ हजार ४४७ रुपयांचे नुकसान झाले आहे़ ही रक्कम १८ टक्के या दराने दंडासहित वसूल करण्याची शिफारस दक्षता खात्याने केली आहे़
> वाहनचालकांकडून नियमबाह्य वसुली करण्यात आली आहे़ ही बाब गैर असून अटी व शर्तीचा भंग आहे़ ठेकेदाराकडून दंड वसूल करून वाहनतळावर यापुढे देखरेख ठेवण्यात यावी़
संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांची प्राथमिक चौकशी करण्यात यावी़
ए विभागातील दुय्यम अभियंता मिलन मेहता यांचे त्वरित निलंबन करून त्यांची प्राथमिक चौकशी सुरू करण्यात यावी़