Join us

मुंबईतील अग्निशमन दलाच्या चार अधिकाऱ्यांना अतुलनीय शौर्याबदद्लचे अग्निशमन सेवा पदक

By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2021 9:35 PM

याचप्रमाणे अनिल भार्गव पवार, केंद्र अधिकारी, तसेच बाळासाहेब उत्तम राठोड, अग्निशामक, यांना आयुक्तांचे अतुलनीय शौर्याबदद्लचे रजत पदक बहाल करण्यात आलेले आहे.

   मुंबई- दक्षिण मुंबईतील मिंट रोड, फोर्ट येथील भानुशाली या सहा मजली निवासी व वाणिज्य वापरातील जुन्या इमारतीचा दक्षिण पूर्वेकडील संपूर्ण भाग 16.07.2020 रोजी 16:43 वाजता  कोसळला होता. यावेळी इमारतीचा उर्वरित भाग व छताचा भाग अत्यंत धोकादायक अवस्थेत लटकत होते. तो केव्हाही कोसळेल, अशी स्थिती होती. इमारतीचा जिन्याचा भागही कोसळला होता. यामुळे ढिगाऱ्याखाली 15 रहिवासी गाडले गेले होते व जिना कोसळल्याने इमारतीच्या इतर भागात 12 रहिवासी अडकले होते. या सर्वांची सुटका करण्यासाठी मुंबई अग्निशमन दलाच्या अधिकारी व जवानांनी अत्यंत धोकादायक परिस्थितीत, स्वतःच्या प्राणाची पर्वा न करता अथक प्रयत्न केले व या सगळ्यांची सुटका केली. त्यामुळे त्यांनी दर्शविलेल्या अतुलनीय शौर्य, व्यवसाय कुशलता व उच्चतम कर्तव्य परायणता याकरीता भारताचे राष्ट्रपती यांनी 15 ऑगस्ट, 2021 या स्वातंत्र्यदिनी मुंबईच्या चार अधिकाऱ्यांना राष्ट्रपतींचे अतुलनीय शौर्याबदद्लचे अग्निशमन सेवा पदक बहाल करण्यात आले आहे. या अधिकाऱ्यांना राष्ट्रपतींचे अतुलनीय शौर्याबदद्लचे अग्निशमन सेवा पदक -- प्रभात सुरजलाल रहांगदळे, उप आयुक्त (आ.व्य.)- हेमंत दत्तात्रय परब, प्रमुख अग्निशमन अधिकारी (प्रभारी)- आत्माराम जगदंबाप्रसाद मिश्रा, विभागीय अग्निशमन अधिकारी- कृष्णात रामचंद्र यादव, विभागीय अग्निशमन अधिकारी 

याचप्रमाणे अनिल भार्गव पवार, केंद्र अधिकारी, तसेच बाळासाहेब उत्तम राठोड, अग्निशामक, यांना आयुक्तांचे अतुलनीय शौर्याबदद्लचे रजत पदक बहाल करण्यात आलेले आहे.

टॅग्स :अग्निशमन दलराष्ट्राध्यक्षमुंबई