मुंबई : मुंबईत मोक्याच्या ठिकाणी आपली जाहिरातबाजी करण्यासाठी जाहिरातदार मोक्याचे ठिकाण शोधत असतात. मात्र या जाहिरात फलकाच्या दर्शनीभागी रस्त्यावरील झाडाची फांदी आल्यास ती फांदी बिनदिक्कत तोडली जाते. त्यामुळे मुंबईत जाहिरातींचे फलक लावण्यासंदर्भात महापालिकेच्या परवाना विभागाने तयार केलेल्या धोरणात याची विशेष दखल घेण्यात आली आहे. त्यानुसार जाहिरात फलकांना झाकणाऱ्या झाडांच्या फांद्या छाटण्यापूर्वी महापालिकेचे ना हरकत प्रमाणपत्र घेणे या धोरणात बंधनकारक करण्यात येणार आहे. तसेच संबंधित कंपनीला चारपट शुल्क भरण्याचा दंडही ठोठाविण्याचे प्रस्तावित आहे.मुंबईत मोक्याच्या ठिकाणी लावण्यात येणाºया फलकांमुळे या शहराचे सौंदर्य विद्रूप होत आहे. यावर अंकुश आणण्याचे आदेश न्यायालयानेही अनेक वेळा महापालिकेला दिले आहेत. त्यानुसार जाहिरात फलकासंदर्भात परवाना विभागाने स्वतंत्र धोरणाचा मसुदा तयार केला आहे.यात दोन जाहिरातींच्या फलकांमध्ये किमान १०० मीटरचे अंतर असावे, अशी शिफारस करण्यात आली आहे. हे अंतर जमिनीवर असलेले फलक, भिंत तसेच गच्चीवरील फलकांच्या आधारे मोजमाप करून ग्राह्य धरले जाणार आहे. म्हणजेच दोन गच्चीवरील फलकांचे अंतर १०० मीटरपेक्षा कमी नसेल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.जाहिरातबाजीसाठी मुंबईत मोठ्या प्रमाणात झाडे आणि झाडांच्या फांद्यांची कत्तल केली जाते. मात्र यापुढे फलक लावण्यासाठी झाडांची कत्तल किंवा फांद्यांची छाटणी करणाºया संबंधित कंपनीला चारपट शुल्क भरण्याचा दंड करण्यात येणार आहे. अशी तरतूद या धोरणाच्या मसुद्यात करण्यात आली आहे. त्याचबरोबर या झाडांच्या फांद्यांची छाटणी करण्यासाठी उद्यान अधीक्षकांची परवानगी बंधनकारक राहणार आहे. त्यांच्या ना हरकत प्रमाणपत्राशिवाय कोणत्याही फलकामध्ये अडसर ठरणाºया झाडांच्या फांद्यांची छाटणी करता येणार नाही, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.जाहिरात फलकांच्या दर्शनी भागात अडसर ठरणाºया किंवा झाडांमुळे फलक झाकले जात असल्याने अशा ठिकाणच्या झाडांच्या फांद्या छाटण्यासाठी उद्यान अधीक्षकांची परवानगी आवश्यक असणार आहे. मात्र उद्यान विभागाला त्या झाडांच्या फांद्या छाटण्याची आवश्यकता आढळून आली तरच ती फांदी तोडण्याची परवानगी मिळू शकेल.दोन जाहिरात फलकांमध्ये किमान १०० मीटरचे अंतर असावे. जमिनीवर असलेले फलक, भिंत तसेच गच्चीवरील फलकांचे मोजमाप करून ग्राह्य धरले जाणार आहे.जाहिरात फलक लावणाºया कंपनीने या जाहिराती फलकांच्या भागात सीसीटीव्ही कॅमेरे लावून त्यांची जोडणी महापालिकेच्या आपत्कालीन नियंत्रण कक्षाला दिल्यास त्यांना जाहिरातींकरता आकारण्यात येणाºया शुल्कात १० टक्के सवलत दिली जाणार आहे.
जाहिरातीसाठी फांद्या तोडल्यास चारपट दंड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 29, 2018 2:15 AM