Join us  

चार तासांत गिरगाव चौपाटी झाली चकाचक !

By admin | Published: December 12, 2014 1:07 AM

पर्यटकांच्या वर्दळीमुळे अनेक ठिकाणी कचराकुंडीचे स्वरूप आलेल्या गिरगाव चौपाटीवर सफाईच्या नवीन प्रयोगाला अखेर यश येऊ लागले आह़े

मुंबई : पर्यटकांच्या वर्दळीमुळे अनेक ठिकाणी कचराकुंडीचे स्वरूप आलेल्या गिरगाव चौपाटीवर सफाईच्या नवीन प्रयोगाला अखेर यश येऊ लागले आह़े आधुनिक यंत्रमुळे सव्वा लाख चौरस मीटर चौपाटीचा परिसर अवघ्या चार तासांमध्ये स्वच्छ होत आह़े तसेच चौपाटीवरील वाळूदेखील भुसभुशीत व मऊशार झाल्याचा दावा प्रशासनाने केला आह़े  
गिरगाव चौपाटीवर लाखो देशी-विदेशी पर्यटकांची वर्दळ असत़े त्यामुळे शहराची ओळख स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी या चौपाटीची सफाई आवश्यक ठरत आह़े परंतु कामगार आणि कचराकुंडय़ांची संख्या वाढवूनही चौपाटीची सफाई अवघड ठरत होत़े त्यामुळे 25 ऑक्टोबरपासून येथे नवीन प्रयोग सुरू झाला़ जर्मनीहून आयात केलेली अत्याधुनिक मशिन दररोज तीन पाळ्यांमध्ये चौपाटीवर चालविण्यात येऊ लागली़ 
यासाठी 12 कामगार तैनात ठेवाले आहेत़ संध्याकाळी चौपाटीवर मोठी वर्दळ असल्याने त्याचवेळी कचरा निर्माण होण्याचे प्रमाण अधिक असत़े त्यामुळे रात्री 11 ते स़ 7 या वेळेत जादा कामगार लावून चौपाटीची सफाई केली जात़े असा सहा हजार किलो कचरा दररोज जमा होत असतो़ हा कचरा डम्पिंग ग्राउंडवर पाठविण्यात येत असल्याचे घनकचरा व्यवस्थापन खात्याचे साहाय्यक अभियंता गुरव यांनी सांगितल़े (प्रतिनिधी)
 
असा होतो मशिनचा वापर
मशिन एका ट्रॅक्टरच्या साहाय्याने चौपाटीच्या प्रत्येक कोनात फिरवणो शक्य होत आह़े या मशिनच्या खाली असणारी सहा इंच लांबीची पाती ही वाळूच्या आतमध्ये 6 इंच शिरून वाळूवरील व आतील बारीक कचराही बाहेर काढत आह़े हा कचरा मशिनमध्येच असणा:या जाळीवरून फिरवला जातो़ ज्यामुळे कचरा व वाळू वेगळे होऊन कचरा मशिनच्या मागे असणा:या कंटेनरमध्ये साठवून वाळू पुन्हा चौपाटीवर टाकण्यात येत आह़े
 
वाळूही मऊशार
या मशिनमुळे सिगारेटच्या थोटकांपासून सगळेच साफ केले जात आह़े सहा इंचांर्पयतची वाळू सातत्याने वरखाली होत असल्यामुळे चौपाटीवरील वाळूचा थर मऊशार व भुसभुशीत राहण्यासही मदत होत आह़े