मुंबई: जवळपास ४ लाख ४ हजार मुंबईकरांनी सुरू असलेल्या सर्वेक्षणात आपली वैयक्तिक माहिती देण्यास नकार दिल्याचे समोर आले आहे. दरम्यान, मागासवर्ग आयोगाच्या सूचनेप्रमाणे मुंबईत सुरू असलेले सर्वेक्षण ऐच्छिक असल्याने या सर्वेक्षणासाठी आतापर्यंत १० टक्के नागरिकांनी याला प्रतिसाद दिलेला नाही.
मागील ९ दिवसांत पालिका कर्मचाऱ्यांकडून ९९ टक्के मुंबईकरांचे सर्वेक्षण केले आहे. तर जवळपास ७ लाख घरे बंद असल्याने त्यांचे सर्वेक्षण होऊ शकले नाही; मात्र आयोगाकडून दिलेल्या मुदतवाढीचा वापर करीत पालिका अधिकारी आवश्यकता असेल तेथे पुन्हा भेटी देतील अशी माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांनी दिली.
महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगामार्फत मराठा समाज व खुल्या प्रवर्गातील सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक मागासलेपण तपासण्यासाठी सर्वेक्षणाला सुरुवात झाली आहे. मुंबईत २३ जानेवारीपासून सुरू झालेल्या या सर्वेक्षणाची जबाबदारी मुंबई महापालिकेकडे आहे.
१९% घरे बंद :
आतापर्यंत मुंबईत झालेल्या सर्वेक्षणात १९ टक्के घरे बंद असल्याचे समोर आले आहे. दरम्यान, आयोगाने सर्वेक्षणात दिलेल्या मुदतवाढीचा पालिका अधिकारी, कर्मचारी या घरांना पुन्हा भेटी देऊन सर्वेक्षण अधिकाधिक पूर्ण करणार आहेत. त्यामुळे सर्वेक्षणास येणाऱ्या कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे असे आवाहन पालिकेने या आधीच केले आहे.
सर्वेक्षणाचा अहवाल २३ ते ३१ जानेवारी : एकूण घरे टक्केएकूण सर्वेक्षण ३८, ६२, १९० ९९. ४५ बंद घरे ७, ०९, ८५७ १९. २ नकार देण्यात आलेली घरे ४, ०४, ०५७ १०. ५सर्वेक्षण पूर्ण झालेली घरे २७, ४७, ६६९ ७०. ३
३१ जानेवारीपर्यंत पालिकेकडून मुंबईतील ३८ लाख ६२ हजार घरांचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले आहे. यामध्ये २७ लाख नागरिकांनी सकृतंक प्रतिसाद देऊन हे सर्वेक्षण पूर्ण करण्यास मदत केली आहे तर ४ लाख लोकांनी नकार दर्शविला आहे.