मुंबईतून चार लाख विद्यार्थी बारावीला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2019 06:05 AM2019-05-28T06:05:52+5:302019-05-28T06:05:55+5:30

राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या इयत्ता बारावीच्या परीक्षेचा निकाल मंगळवार, २८ मे रोजी दुपारी १ वाजता ऑनलाइन पद्धतीने जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती राज्य शिक्षण मंडळाकडून देण्यात आली.

Four lakh students from Mumbai, twelve | मुंबईतून चार लाख विद्यार्थी बारावीला

मुंबईतून चार लाख विद्यार्थी बारावीला

Next

मुंबई : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या इयत्ता बारावीच्या परीक्षेचा निकाल मंगळवार, २८ मे रोजी दुपारी १ वाजता ऑनलाइन पद्धतीने जाहीर करण्यात येणार असल्याची माहिती राज्य शिक्षण मंडळाकडून देण्यात आली. बारावीची परीक्षा २१ फेब्रुवारी ते २० मार्चदरम्यान घेण्यात आली होती. मुंबईतून ३ लाख ८३ हजार ३२० विद्यार्थ्यांनी ९९९ परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा दिली होती.
यंदा बारावीच्या परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये कला शाखेच्या विद्यार्थ्यांची संख्या ५४ हजार ५६, वाणिज्य १ लाख ७५ हजार ७७४, तर शास्त्र शाखेच्या विद्यार्थ्यांची संख्या ९१ हजार १७८ इतकी आहे. एमसीव्हीसीच्या विद्यार्थ्यांची संख्या ४ हजार ४२० इतकी होती.
दरम्यान, मुंबई विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयात प्रथम वर्ष पदवीला प्रवेश घेऊ इच्छिणाºया विद्यार्थ्यांसाठी प्रवेशपूर्व आॅनलाइन नावनोंदणी अनिवार्य असते. त्याचे वेळापत्रक बारावीच्या निकालानंतर लगेचच जाहीर करणार आहे, अशी माहिती विद्यापीठ प्रशासनाने दिली.
>महाविद्यालयांसाठी विशेष शिबिर
प्रथम वर्ष पदवी अभ्यासक्रमाच्या प्रवेशावेळी दरवर्षी उडणारा गोंधळ लक्षात घेऊन या प्रवेश प्रक्रियेची माहिती देण्यासाठी मुंबई विद्यापीठाने संलग्न महाविद्यालयांसाठी कार्यशाळा घेतली. यात ३९५ महाविद्यालयांनी सहभाग नोंदवला होता. यामध्ये प्रथम वर्षासाठी प्रवेशित होणाºया विद्यार्थ्यांची नावनोंदणी, पात्रता, स्थलांतर आणि इतर आनुषंगिक समस्यांचे निराकरण करण्यासाठी प्रथमच एमकेसीएलमार्फत गुगल फॉर्म तयार केला आहे.

Web Title: Four lakh students from Mumbai, twelve

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.