साडेचार लाखांचा गुटखा जप्त
By admin | Published: February 25, 2015 10:47 PM2015-02-25T22:47:23+5:302015-02-25T22:47:23+5:30
मुंबई-अहमदाबाद महामार्गावरुन मुंबईकडे जाणाऱ्या टेम्पोचा पाठलाग करून मनोर पोलीसांनी ४ लाख ५० हजार रू. चा गुटखा पकडला.
मनोर : मुंबई-अहमदाबाद महामार्गावरुन मुंबईकडे जाणाऱ्या टेम्पोचा पाठलाग करून मनोर पोलीसांनी ४ लाख ५० हजार रू. चा गुटखा पकडला. मात्र टेम्पोचे चालक व क्लिनर टेम्पोसोडून फरार झाले. हाती लागलेला गुटखा व टेम्पो याद्वारे गुटखा किंगला पोलीस हुडकून काढतील, अशी प्रतिक्रीया मारोती पाटील सहा. पो. नि. यांनी लोकमतला दिली.
महाराष्ट्र राज्यामध्ये गुटखा बंद असला तरी गुजरातमधून अवैध मार्गाने महाराष्ट्र व मुंबईत राजरोसपणे गुटखा येतो. चोरी चोरी चुपके चुपके पान टपरी व इतर दुकानात माणसे ओळखून गुटखा दुप्पट किमतीने विक्री केला जातो. मात्र मनोर पोलीसांना मिळालेल्या माहितीनुसार टेण नाका येथे सापळा रचण्यात आला होता. गुजरातवरून मुंबईच्या दिशेने भरधाव वेगात हा टेम्पो जात असताना पोलीसांनी अडविण्याचा प्रयत्न केला असता चालक पळाला पुन्हा पोलीसांनी पाठलाग केला. दोन किलोमीटर अंतरावर टेम्पो सापडला. पण चालक व क्लिनर पळून गेले होते. सहा. पो. नि. पाटील यांनी टेम्पो ताब्यात घेतला असता त्या टेम्पोमध्ये गुटखाच्या गोणी आढळल्यात. त्यात एकूण ४ लाख ५० हजार रू. चा गुटखा मिळाला आहे. (वार्ताहर)