चार सदस्यीय प्रभाग पद्धत ठरले वरदान

By admin | Published: February 24, 2017 03:42 AM2017-02-24T03:42:04+5:302017-02-24T03:42:04+5:30

महापालिका निवडणुकांमध्ये भाजपाला फायदा व्हावा या उदद्ेशाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चार सदस्यी प्रभाग

Four-member ward method is a boon | चार सदस्यीय प्रभाग पद्धत ठरले वरदान

चार सदस्यीय प्रभाग पद्धत ठरले वरदान

Next

पुणे : महापालिका निवडणुकांमध्ये भाजपाला फायदा व्हावा या उदद्ेशाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चार सदस्यी प्रभाग पध्दतीने महापालिकांच्या निवडणुका घेण्याचा निर्णय भाजपासाठी मोठे वरदान ठरल्याचे निकालावरून स्पष्ट होत आहे. शहरातील अनेक प्रभागांमध्ये भाजपाला पॅनेल टू पॅनेल विजय मिळाल्याने त्यांची खेळी पूर्णपणे यशस्वी ठरली आहे.
राज्यभर महापालिकेच्या निवडणूका वॉर्ड पध्दतीने घेतल्या जात होत्या. मात्र विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या यशाच्या पार्श्वभुमीवर भाजपाने ४ सदस्यांचा एक प्रभाग करून महापालिकेसाठी मिनी विधानसभा मतदारसंघ पध्दतीने निवडणुका घेतल्या. या निवडणुका उमेदवारांच्या नावावर न होता पक्षांच्या नावावर व्हाव्यात यासाठी भाजपाने खेळलेली खेळी पूर्णपणे यशस्वी झाल्याचे दिसून येत आहे.
महापालिका निवडणुकीपूर्वी भाजपाने एक सर्व्हे केला होता. त्यामध्ये चार सदस्यीय प्रभाग पध्दतीने महापालिकेच्या निवडणुका झाल्यास त्यामध्ये भाजपाला मोठे यश मिळेल असा अंदाज वर्तविण्यात आला होता. त्यानुसार चार सदस्यीय पध्दतीने महापालिका निवडणुका घेण्याचा निर्णय घेण्यात आला.
या निर्णयाला कोणत्याच पक्षाकडून फारसा विरोध झाला नाही. मात्र मनसे सारख्या छोटया पक्षांना याचा मोठा फटका बसल्याचे दिसून येत आहे.
काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये यंदा पहिल्यांदाच झालेली अर्धी आघाडी, भाजप-शिवसेना युतीत झालेली ताटातूट आणि स्वबळावर लढणारे शिवसेना व मनसेमुळे काही ठिकाणी पंचरंगी तर काही ठिकाणी चौरंगी, तिरंगी लढती झाल्या असून त्याचे निकाल काय लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भाजपाच्या बालेकिल्ल्यात आयोजित केलेली सभेला नागरिकांनी दांडी मारल्याने तो चर्चेचा विषय ठरला होता. मात्र त्यानंतर तिथल्या भाजपाच्या परंपरागत मतदारांनी मोठया संख्येने बाहेर पडून मतदान केले होते.
(प्रतिनिधी)

प्रभाग पध्दतीनुसार अनेक प्रभागांमध्ये पॅनेल टू पॅनेल उमेदवार निवडून आणण्यात भाजपाला यश आले. प्रभाग प्रभाग क्रमांक ४, ५, ७, ८, १८, २८, २९, ३३, ३४, ४१, मध्ये चारही उमेदवार भाजपाचे विजयी झाले. प्रभाग क्रमांक ४, २२ मध्ये राष्ट्रवादीला चारही उमेदवार निवडून आणता आले.
भाजपाचा बालेकिल्ला असलेल्या कसबा, कोथरूड, पर्वती विधानसभा मतदारसंघात भाजपाने जोरदार जागा मिळविल्याच त्याचबरोबर शिवाजीनगर, वडगाव शेरी, हडपसर, कॅन्टोन्मेंट, खडकवासला या विधानसभा मतदारसंघातही भाजपाने घवघवीत यश मिळविले आहे. राष्ट्रवादीला अनेक ठिकाणी धक्के बसले.

Web Title: Four-member ward method is a boon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.