Join us

आणखी चार भंगार व्यापारी अटकेत

By admin | Published: April 18, 2016 1:50 AM

देवनार डम्पिंग ग्राउंडला लागलेल्या आगीप्रकरणी आणखी चार भंगार विक्रेत्यांना अटक करण्यात आली आहे. त्यामुळे अटक आरोपींची संख्या १३ झाली आहे. यामध्ये आणखी काही आरोपींना

मुंबई : देवनार डम्पिंग ग्राउंडला लागलेल्या आगीप्रकरणी आणखी चार भंगार विक्रेत्यांना अटक करण्यात आली आहे. त्यामुळे अटक आरोपींची संख्या १३ झाली आहे. यामध्ये आणखी काही आरोपींना अटक होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. देवनार डम्पिंग ग्राउंडलगत असलेल्या अवैध भंगार विक्रीच्या व्यवसायामुळे देवनारमधील आग धुमसत असल्याचे स्पष्ट होताच शनिवारी नऊ आरोपींना अटक करण्यात आली होती. न्यायालयाने त्यांना १४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यापाठोपाठ शनिवारी रात्री उशिरा आणखी चार भंगार विक्रेत्यांच्या शिवाजीनगर पोलिसांनी मुसक्या आवळल्या. फिरोज खान (३३), कलाम शेख (४४), सईद अफजूल (४६) आणि विजय कुमार गुप्ता (३३) अशी अटक आरोपींची नावे आहेत. दुसरीकडे आजही अटक भंगार विक्रेत्यांच्या नातेवाइकांचा नाराजीचा सूर कायम असल्याचे दिसून आले. या प्रकरणातील मुख्य सूत्रधारांकडे पोलीस दुर्लक्ष करीत असून निर्दोषांना पकडत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. अटकेच्या भीतीने अनेक भंगार व्यावसायिक दुकाने बंद करून पसार झाले आहेत. दरम्यान, काही जण अजूनही छुप्या पद्धतीने त्यांचा कारभार चालवत असल्याचेही स्थानिकांचे म्हणणे आहे.