मुंबईत दोन दिवसात चार अवयवदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2021 04:07 AM2021-03-08T04:07:18+5:302021-03-08T04:07:18+5:30

मुंबई : मुंबईत सध्या कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. त्यामुळे अवयवांची गरज असणाऱ्यांची यादी वाढत असताना अवयवदात्यांची ...

Four organ donations in two days in Mumbai | मुंबईत दोन दिवसात चार अवयवदान

मुंबईत दोन दिवसात चार अवयवदान

Next

मुंबई : मुंबईत सध्या कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. त्यामुळे अवयवांची गरज असणाऱ्यांची यादी वाढत असताना अवयवदात्यांची संख्या मात्र घटली आहे. परंतु, ३ आणि ४ मार्च या दोन दिवसांत मुंबईत चार अवयवदान करण्यात आले असून त्यामुळे गरजूंना मदत होणार आहे. यात चार किडनी आणि तीन यकृते गरजूंना देण्यात आली. त्यातील दोन किडन्या, एक यकृत आणि एक हृदय हे प्रत्यारोपणासाठी योग्य आढळले नाही. मंगळवार मध्यरात्री अवयवदानाची सुरुवात झाली. त्यानंतर बुधवार, ३ मार्चला सकाळी ८ वाजून २४ मिनिटांनी, तसेच मध्यरात्री १ वाजून ०१ मिनिटांनी आणि त्यानंतर गुरुवार, ४ मार्चला सकाळी ८ वाजून ५६ मिनिटांनी असे एकूण चार अवयवदान दोन दिवसात झाले. त्यामुळे कोरोना काळातही न घाबरता पुढाकार घेतलेल्या कुटुंबीयांवर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

एका ७९ वर्षांच्या ज्येष्ठ नागरिकाच्या यकृतामुळे एका नागरिकाला जीवदान मिळाले. तर अन्य दात्यांचे अवयव माहीममधील एस. एल. रहेजा, फोर्टिस हॉस्पिटल, नवी मुंबईतील अपोलो हॉस्पिटल, लीलावती हॉस्पिटल आणि मुलुंडचे फोर्टिस हॉस्पिटल येथे दान झाले. या चार अवयवदानांमुळे जनजागृतीला बळकटी मिळाली आहे. तसेच शहरातील अवयवदान वाढवण्यासाठीच्या यशात झेडटीसीसीचा मोठा वाटा आहे. झेडटीसीसी समन्वयक उर्मिला महाजन यांना अल्पावधीत चार अवयवदानाच्या घटना हाताळणे अवघड होते. मात्र, रुग्णालये आणि दात्यांच्या कुटुंबामुळे हे शक्य झाले, असे त्या म्हणाल्या.

Web Title: Four organ donations in two days in Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.