डॉ. दीपक अमरापूरकर यांच्या मृत्यूप्रकरणी 4 जणांना अटक, 22 सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 18, 2017 08:34 AM2017-09-18T08:34:36+5:302017-09-18T09:54:57+5:30

डॉक्टर दीपक अमरापूरकर यांच्या मृत्यूप्रकरणी चार जणांना अटक करण्यात आली आहे. या चारही जणांना 22 सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

Four persons arrested in connection with the death of Deepak Amrapurkar | डॉ. दीपक अमरापूरकर यांच्या मृत्यूप्रकरणी 4 जणांना अटक, 22 सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी

डॉ. दीपक अमरापूरकर यांच्या मृत्यूप्रकरणी 4 जणांना अटक, 22 सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी

Next

मुंबई, दि.18 - बॉम्बे हॉस्पिटलचे पोटविकारतज्ज्ञ डॉक्टर दीपक अमरापूरकर यांच्या मृत्यूप्रकरणी पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे. मुंबईत 29 ऑगस्ट रोजी झालेल्या मुसळधार पावसात मॅनहोलमध्ये पडून डॉक्टर दीपक अमरापूरकर यांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर दोन दिवसांनी त्यांचा मृतदेह वरळी कोळीवाड्याजवळ सापडला होता.  याप्रकरणी दादर पोलिसांनी परळमध्ये राहणाऱ्या चौघांना अटक केली आहे. या चारही जणांना 22 सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. 

'टाईम्स ऑफ इंडिया'ने दिलेल्या वृत्तानुसार,  सिद्धेश भेलसेकर (वय 25 वर्ष), राकेश कदम (वय 38 वर्ष) त्याचा भाऊ निलेश आणि दिनार पवार (वय 36 वर्ष) अशी अटक केलेल्या चार जणांची नावे आहेत. डॉक्टर अमरापूरकर यांच्या मृत्यूला कारणीभूत ठरल्याने त्यांच्यावर निष्काळजीपणाचा ठपका ठेवण्यात आला आहे. अटक केलेल्या चार जणांनी मॅनहोलचं झाकण उघडले होते. पावसाचं पाणी त्यांच्या घरात शिर होतं, या पाण्याचा निचरा व्हावा यासाठी  त्यांनी मॅनहोलचं झाकण उघडल्याचे माहिती समोर आली आहे. 

या चारही जणांना  शनिवारी (16 सप्टेंबर) अटक करण्यात आली. यानंतर त्यांना भोईवाडा दंडाधिकारी न्यायालयाने सात दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आल्याची  माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त सुनील देशमुख यांनी दिली आहे.

या कारवाईबाबत प्रतिक्रिया देताना पोलिसांनी सांगितले की,  'आम्ही परिसरातील अनेकांची चौकशी केली. या चौघांनी घरात पाणी घुसू नये म्हणून सेनापती बापट मार्गावरील सुपर्श इमारतीजवळील मॅनहोलवरील झाकण उघडल्याची माहिती मिळाली. त्यांना झाकण उघडण्याचा कोणताही अधिकार नव्हता. शिवाय त्यांनी कोणताही सूचना फलक लावला नव्हता'.

Web Title: Four persons arrested in connection with the death of Deepak Amrapurkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.