वॉर्डात चौरंगी लढती

By admin | Published: February 12, 2017 03:56 AM2017-02-12T03:56:09+5:302017-02-12T03:56:09+5:30

यंदा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांच्या उमेदवारांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. पश्चिम उपनगरातील के-ईस्ट वॉर्डचा विचार करता येथे आजी, माजी लोकप्रतिनिधींसह

Four rounds in Ward | वॉर्डात चौरंगी लढती

वॉर्डात चौरंगी लढती

Next

मुंबई : यंदा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांच्या उमेदवारांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. पश्चिम उपनगरातील के-ईस्ट वॉर्डचा विचार करता येथे आजी, माजी लोकप्रतिनिधींसह पक्षांतर केलेले उमेदवार आणि नवखे उमेदवारही आपले नशीब आजमावत आहेत. विशेषत: आघाडी आणि युतीचा काडीमोड झाल्याने यंदाची निवडणूक सर्वच राजकीय पक्षांच्या उमेदवारांची परीक्षा घेणार असून, यात कोण उत्तीर्ण होतो? याकडे मुंबईकरांचे लक्ष लागून राहिले आहे.
के-ईस्ट वॉर्डमध्ये प्रभाग क्रमांक ७२मधून सेनेचे अनिल माने, भाजपाचे पंकज यादव, काँग्रेसच्या शिल्पा दळवी, राष्ट्रवादीच्या श्रद्धा जाधव यांच्यात जोरदार लढत होत आहे. प्रभाग क्रमांक ७३चा विचार करता लोकप्रतिनिधीपद भूषविलेल्या भाजपाच्या भालचंद्र आंबोरे यांना सेनेचे प्रवीण शिंदे, काँग्रेसचे नितीन सावंत, राष्ट्रवादीचे संजय महाले आणि मनसेचे प्रमोद म्हस्कर यांच्याशी लढावे लागत आहे.
प्रभाग क्रमांक ७४मध्ये लोकप्रतिनिधीपद भूषविलेल्या भाजपाच्या उज्ज्वला मोडक यांची लढत सेनेच्या रचना सावंत, काँग्रेसच्या पुष्पा भोले, राष्ट्रवादीच्या कल्पना नाईक आणि मनसेच्या संध्या मोरे यांच्याशी आहे. प्रभाग क्रमांक ७५मध्येही लोकप्रतिनिधीपद भूषविलेल्या शिवसेनेच्या प्रियंका सावंत यांना भाजपाच्या निर्मला माने, काँग्रेसच्या अंजना दूधवडकर, राष्ट्रवादीच्या नयना खैरनार आणि मनसेच्या यशश्री पाटील यांच्याशी लढावे लागत आहे.
प्रभाग क्रमांक ७६मध्ये सेनेचे सत्यवान मणचेकर, भाजपाच्या केशरबेन पटेल, काँग्रेसचे नितीन सलगरे, राष्ट्रवादीच्या मीनाक्षी चाळके, मनसेचे देवजी बणे यांच्यात जोरदार लढत आहे. प्रभाग क्रमांक ७७ मध्ये सेनेचे अनंत नर, भाजपाचे प्रशांत कुलकर्णी, काँग्रेसचे गजानन लाड, मनसेचे संजय बने यांच्यात लढत आहे.
प्रभाग क्रमांक ७८मध्ये सेनेच्या नेहा शेख, भाजपाच्या हिना शाह, काँग्रेसच्या जमिला शाह, राष्ट्रवादीच्या नाझीबानो सोफिया यांच्यात लढत सुरू आहे. प्रभाग क्रमांक ७९मध्ये सेनेचे सदानंद परब, भाजपाचे संतोष मढेकर, काँगेसचे पुरुषोत्तम जळगावकर, मनसेच्या मोनिका फर्नांडिस यांच्यात लढत रंगत आहे.
प्रभाग क्रमांक ८०मध्ये सेनेचे मनोहर पांचाळ, भाजपाचे सुनील यादव, काँग्रेसचे मुकेश शर्मा, राष्ट्रवादीचे बबन मदाने, मनसेचे विशाल हळदणकर यांच्यात लढत रंगली असून, प्रभाग क्रमांक ८१मध्ये सेनेचे संदीप नाईक, भाजपाचे मुरुजी पटेल, काँग्रेसच्या ज्योती बिर्जे, राष्ट्रवादीच्या सीमा बनसोड, मनसेचे संतोष गिरी यांच्यात जोरदार लढत आहे.
प्रभाग क्रमांक ८२मध्ये सेनेचे सुभाष सावंत, भाजपाचे संतोष केळकर, काँग्रेसचे जगदीश अमिन, राष्ट्रवादीच्या रजमानी शुक्ला, मनसेचे संजय धावरे यांच्यात जोरदार लढत असून, प्रभाग क्रमांक ८३मध्ये सेनेच्या निधी सावंत, भाजपाच्या पूर्णिमा माने, काँग्रेसच्या विन्नी डिसुजा, राष्ट्रवादीच्या सुजाता आठवले, मनसेच्या सोनाली सातपुते यांच्यात लढत रंगली आहे.
प्रभाग क्रमांक ८४मध्ये सेनेच्या वीणा भागवत, भाजपाच्या अभिजित सामंत, काँग्रेसचे प्यारेलाल तेली, मनसेचे संदीप दळवी, प्रभाग क्रमांक ८५मध्ये सेनेचे चंद्रकांत पवार, भाजपाच्या ज्योती अळवणी, काँग्रेसचे नरेंद्र हिरानी, मनसेचे मिलिंद कोरगावकर यांच्यात लढत रंगली असून, प्रभाग क्रमांक ८६मध्ये सेनेच्या पार्वती निकम, भाजपाच्या हरप्रीत कौर, काँग्रेसच्या सुषमा राय, राष्ट्रवादीच्या बैग माजू, मनसेच्या श्रुती खडपे यांच्यात घमासान सुरू आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Four rounds in Ward

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.