एलटीटी ते करमाळी चार विशेष एक्स्प्रेस

By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2020 05:09 AM2020-01-11T05:09:12+5:302020-01-11T05:09:18+5:30

मध्य आणि कोकण रेल्वे प्रशासनाच्या वतीने लोकमान्य टिळक टर्मिनस ते करमाळी यादरम्यान चार विशेष एक्स्प्रेस चालविण्यात येणार आहेत.

Four special express from LTT to Karmali | एलटीटी ते करमाळी चार विशेष एक्स्प्रेस

एलटीटी ते करमाळी चार विशेष एक्स्प्रेस

Next

मुंबई : मध्य आणि कोकण रेल्वे प्रशासनाच्या वतीने लोकमान्य टिळक टर्मिनस ते करमाळी यादरम्यान चार विशेष एक्स्प्रेस चालविण्यात येणार आहेत. १७, १९, २४, २६ जानेवारी रोजी या साप्ताहिक विशेष फेऱ्या चालविण्यात येतील. गर्दीचे नियोजन करण्यासाठी विशेष एक्स्प्रेस चालविण्याचा निर्णय घेतला आहे.
साप्ताहिक विशेष एक्स्प्रेस १७ आणि २४ जानेवारी रोजी सायंकाळी ८.४५ वाजता एलटीटीहून सुटेल. ही एक्स्प्रेस करमाळी येथे सकाळी ९ वाजता पोहोचेल. साप्ताहिक विशेष एक्स्प्रेस १९ आणि २६ जानेवारी रोजी सकाळी ८.२० वाजता करमळीहून सुटेल. ही एक्स्प्रेस एलटीटीला रात्री १२.१० वाजता पोहोचेल. या एक्स्प्रेसला ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी आणि थिवि येथे थांबा दिला जाणार आहे.

Web Title: Four special express from LTT to Karmali

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.