प्रजासत्ताक दिनी मुंबई-करमाळी चार विशेष गाड्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2019 04:55 AM2019-01-22T04:55:05+5:302019-01-22T04:55:07+5:30
मध्य रेल्वे मार्गावरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते करमळी आणि करमळी ते पनवेल चार विशेष जादा गाड्या प्रजासत्ताक दिनानिमित्त चालविण्यात येणार आहेत.
मुंबई : मध्य रेल्वे मार्गावरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते करमळी आणि करमळी ते पनवेल चार विशेष जादा गाड्या प्रजासत्ताक दिनानिमित्त चालविण्यात येणार आहेत.
सीएसएमटी ते करमळी ०१००३ क्रमांकाची गाडी २६ जानेवारला रात्री सीएसएमटी येथून १२ वाजून २० मिनिटांनी करमाळीसाठी सुटेल. तर ०१००४ क्रमांकाची करमळी ते सीएसएमटी गाडी २७ जानेवारी रोजी दुपारी २ वाजता करमळी येथून सुटेल. दोन्ही गाड्या दादर, ठाणे, पनवेल, रोहा, खेड, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, कुडाळ, सावंतवाडी, थिविम येथे थांबतील.
०१००६ क्रमांकाची गाडी करमळी येथून २६ जानेवारीला दुपारी दोनला सुटेल. ती पनवेलला रात्री ११.५० ला पोहोचेल. तर, ०१००५ क्रमांकाची पनवेल-करमळी २७ जानेवारीला रात्री १२.४५ ला सीएसएमटीसाठी निघेल. करमळी येथे दुपारी दीडला पोहोचेल. थिविम, सावंतवाडी, कुडाळ, कणकवली, रत्नागिरी, चिपळूण, खेड, रोहा येथे या दोन्ही गाड्या थांबतील.