मोठी बातमी! मुंबईत कुर्ला येथील इमारत दुर्घटनेतील मृतांचा आकडा १० वर पोहोचला, १३ जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2022 08:04 AM2022-06-28T08:04:41+5:302022-06-28T08:06:20+5:30
मुंबईतील कुर्ला परिसरात एक चार मजली इमारत कोसळल्यानं मोठी दुर्घटना घडली आहे. कुर्ला बस डेपोच्या जवळच असलेली नाईक नगर सोसायटी नावाची चार मजली इमारत काल मध्यरात्रीच्या सुमारास कोसळली.
मुंबईतील कुर्ला परिसरात एक चार मजली इमारत कोसळून घडलेल्या दुर्घटनेतील मृतांचा आकडा आता १० वर पोहोचला आहे. कुर्ला बस डेपोच्या जवळच असलेली नाईक नगर सोसायटी नावाची चार मजली इमारत काल मध्यरात्रीच्या सुमारास कोसळली. इमारतीची संपूर्ण एक विंग कोसळल्यानं सर्वत्र खळबळ उडाली. त्यानंतर घटनास्थळावर अग्निशमन दल आणि एनडीआरएफच्या जवानांचीही तुकडी तातडीनं पोहोचली. एनडीआरएफच्या जवनांकडून रात्रभर बचावकार्य सुरू होते. यात जवनांनी सात जणांना सुखरुप बाहेर काढलं. त्यांच्यावर नजिकच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ढिगाऱ्याखाली आणखी २० ते २५ जण अडकले असल्याची शंका व्यक्त करण्यात आली होती.
BREAKING: मुंबईतील कुर्ला येथे चार मजली इमारत कोसळली, बचाव कार्य सुरूhttps://t.co/CbvSFUjpi9pic.twitter.com/73AoiE2NPb
— Lokmat (@lokmat) June 28, 2022
एनडीआरएफच्या जवनांकडून बचाव कार्य हाती घेण्यात आल्यानंतर ढिगाऱ्याखालून एक-एक मृतदेह बाहेर काढण्यात येत आहेत. आतापर्यंत १० मृतदेह आढळून आले आहेत. तर एकूण १३ जण जखमी आहेत. यातील ९ जणांवर उपचार पूर्ण झाले आहेत. तर इतर चार जणांवर अद्याप रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनास्थळावर स्थानिक पोलीस, महापालिकेचे अधिकारी, एनडीआरएफचं पथक आणि अग्निशमन दलाचे जवान उपस्थित आहेत. बचावकार्य वेगानं सुरू आहे.
#WATCH Four-storey building collapse in Kurla, Mumbai | 1 more rescued alive. Rescue operation on. No confirmation on how many people still trapped: Ashish Kumar, NDRF Deputy Commandant
— ANI (@ANI) June 28, 2022
Total 8 people rescued so far, as per BMC pic.twitter.com/5X1WIPHTiT