Join us

चार खलाशांचा वाचवला जीव

By admin | Published: July 15, 2016 1:22 AM

मुंबईकडे जाणाऱ्या एका बोटीत तारपूरच्या किनारपट्टीलगत पाणी शिरून चार खलाशी संकटात सापडल्याची माहिती घिवलीच्या मच्छीमारांनी तारापूर पोलिसांना काळविल्यानंत

हितेन नाईक/पंकज राऊत,  पालघर/बोईसरमुंबईकडे जाणाऱ्या एका बोटीत तारपूरच्या किनारपट्टीलगत पाणी शिरून चार खलाशी संकटात सापडल्याची माहिती घिवलीच्या मच्छीमारांनी तारापूर पोलिसांना काळविल्यानंतर रेस्क्यू टीमने तत्काळह कारवाई करून त्या चौघांचे प्राण वाचवले. ही माहिती तारापूर पोलीस स्टेशन चे सहा.पोलीस निरीक्षक बांगर यांनी लोकमतला दिली.वाढवण येथून ११ जुलै रोजी वडराईच्या दिशेने जात असलेली अज्ञात बोट दिसून आल्या नंतर सुरक्षा यंत्रणा सतर्क झाली होती.कोस्ट गार्ड, पोलीस यंत्रणा, बंदर विभाग ची मोठी धावापळ उडून सर्वत्र नाकाबंदी आणि संशयितांची तपासणी करण्यात आली होती. कोस्ट गार्डने या बोटीची आणि त्यातील चार खलाशा ची कागदपत्रासह कसून तपासणी केली असता ती कुलाब्यातील मेर्नोस श्रॉफ यांच्या ग्रो मोअर इम्पॅक्स प्रायव्हेट लिमिटेडची असून ती टग बोट आहे. १० जुलै रोजी ती हजीरा येथून कुलाब्याकडे निघाली होती. वादळामुळे ती भरकटली असे निष्पन्न झाल्यामुळे त्यांना सोडून देण्यात आले होते. नंतर ४ खलाशांना घेऊन ही बोट कुलाब्याच्या दिशेने निघाली होती. परंतु मुसळधार पाऊस आणि तुफानी वादळी वाऱ्यामुळे पुन्हा भरकटून ती बोट मंगळवारी संध्याकाळी तारापूर अणुऊर्जा प्रकल्पाच्या समोरील समुद्रातल्या खडकामध्ये अडकून पडली. खडकांवर आदळल्याने तिला भगदाड पडून पाणी शिरू लागल्या नंतर खलाशी घाबरले. या प्रकारा नंतर तारापूर अणुऊर्जा प्रकल्पाच्या समोर समुद्रात एक अज्ञात बोट उभी असल्याची माहिती घिवलीच्या मच्छीमारांनी तारापूर पोलिसांना दिली. पुन्हा पोलीस यंत्रणा सक्रिय झाली. तोपर्यंत बोटीची ओळख पटली होती. मच्छीमारांच्या बोटी किनाऱ्यावर शाकारून ठेवण्यात आल्याने या चौघांच्या बाचावासाठी तात्काळ बोट उपलब्ध नव्हती. परंतु मच्छीमार आणि पोलीस मित्रांनी उधाणलेल्या सागरात उड्या टाकून या बोटीतील चौघा खलाशांना किनाऱ्यावर सुखरुप आणले.