CoronaVirus: चार हजार ३१२ ज्येष्ठांना संसर्गाचा धोका

By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2020 05:12 AM2020-04-29T05:12:35+5:302020-04-29T05:12:47+5:30

पालिकेच्या चारशे लोकांच्या पथकाने गेल्या दोन दिवसांत ३१ हजार ८७२ घरांमध्ये तपासणी केली. यापैकी विविध आजार असलेल्या चार हजार ३१२ ज्येष्ठांना संसर्गाचा धोका असल्याचे समोर आले आहे.

Four thousand 312 seniors at risk of infection | CoronaVirus: चार हजार ३१२ ज्येष्ठांना संसर्गाचा धोका

CoronaVirus: चार हजार ३१२ ज्येष्ठांना संसर्गाचा धोका

Next

मुंबई :  मुंबईत कोरोना बाधित रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. यामध्ये ज्येष्ठ नागरिकांचे प्रमाण अधिक असल्याचे आढळले आहे. त्यामुळे मुंबईतील सर्व ज्येष्ठ नागरिकांची तपासणी करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला. त्यानुसार पालिकेच्या चारशे लोकांच्या पथकाने गेल्या दोन दिवसांत ३१ हजार ८७२ घरांमध्ये तपासणी केली. यापैकी विविध आजार असलेल्या चार हजार ३१२ ज्येष्ठांना संसर्गाचा धोका असल्याचे समोर आले आहे.
सर्वेक्षणात रक्तदाब, दमा, मधुमेह यासारखे आजार असल्याचे आढळले. यापैकी कोमॉर्बिड' गटातील अडीच टक्के रुग्णांमध्ये रक्तातील प्राणवायूचे प्रमाण ९५ टक्क्यांपेक्षा कमी असल्याचे आढळले.
'कोमॉर्बिड' गटात असेलेल्यांच्या रक्तातील प्राणवायूची पातळी ९५ टक्क्यांपेक्षा कमी असल्यास त्यांना या मोठ्या प्रमाणात धोका संभवतो. त्यामुळे अडीच टक्के नागरिकांना आॅक्सिजन थेरपी' साठी पालिकेने रुग्णालयात दाखल केले आहे.
>आरोग्य केंद्र निहाय पथकाची स्थापना
अनियंत्रित मधुमेह, अनियंत्रित रक्तदाब, अनियंत्रित स्वरूपाचे श्वसनाचे आजार, मूत्रपिंड विकार, थॉयराइड विषयक आजार, अनियंत्रित दम्याचा त्रास असलेल्यांना अधिक धोका संभवतो, असे निदर्शनास आले आहे. 'कोमॉर्बिड' गटात असलेल्या अशा ज्येष्ठांवर तात्काळ उपचारासाठी सर्वेक्षण केले जात आहे. कोरोनाबाबत काय काळजी घ्यावी, याबाबतचे मार्गदर्शन संबंधितांना करण्यात येत आहे. त्याचबरोबर काही लक्षणे आढळून आल्यास वैद्यकीय तपासणी व आवश्यक ते उपचार करण्यात येत आहेत. मुंबईतील सर्व आरोग्य केंद्रांच्या परिसरातील ज्येष्ठ नागरिकांचे सर्वेक्षण करण्यात येत आहे. यासाठी प्रत्येक आरोग्य केंद्र निहाय एका पथकाची स्थापना केली आहे.

Web Title: Four thousand 312 seniors at risk of infection

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.