Join us

CoronaVirus News in Mumbai: आरोग्य सेविकांच्या मानधनात चार हजार रुपयांची वाढ

By ऑनलाइन लोकमत | Published: May 01, 2020 1:03 AM

अखेर त्यांचे मानधन चार हजार रुपयांनी वाढविण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. याचा लाभ साडेतीन हजार आरोग्य स्वयंसेविका मिळणार आहे.

मुंबई : कोरोनाविरुध्द सुरू असलेल्या लढ्यात डॉक्टर आणि परिचारिकांच्या बरोबरीने काम करणाऱ्या आरोग्य सेविका मात्र दुर्लक्षित राहत आहेत. त्यांनाही संसर्गाचा धोका असताना केवळ पाच हजार एवढ्या तुटपुंज्या रकमेवर काम करावे लागत आहे. याबाबत कामगार संघटनांकडून तीव्र नाराजी व्यक्त होत होती. अखेर त्यांचे मानधन चार हजार रुपयांनी वाढविण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. याचा लाभ साडेतीन हजार आरोग्य स्वयंसेविका मिळणार आहे.महापालिकेत काम करणाºया या आरोग्य सेविकांना विशेषत: झोपडपट्टीसारख्या आव्हानात्मक परिसरांमध्ये आरोग्य सेवासुविधा देण्यासाठी काम करावे लागत असते. मात्र या कामासाठी त्यांना अवघे पाच हजार रुपये मानधन दिले जाते.ही रक्कम आजच्या युगात अगदी तुटपुंजी असल्याने त्यांचे मानधन वाढविण्याची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून होत आहे. परंतु, अनेक वेळा ही मागणी मान्य करण्याची तयारी दाखविणाºया प्रशासनाने प्रत्यक्षात या आरोग्य सेविकांच्या तोंडाला पाने पुसली होती. झोपडपट्टी भागात कोरोनाबाधित लोकांना शोधण्यासाठी या कर्मचाऱ्यांची मदत घेण्यात येत आहे. यामुळे त्यांना संसर्ग होण्याचा धोका वाढला आहे.>पूर्वलक्षी प्रभावाने लागू होणारही वाढ सप्टेंबर २०१९ पासून पूर्वलक्षी प्रभावाने लागू करण्यात आली आहे. सात महिन्यांच्या थकबाकीसह वाढीव मानधन 'मे' महिन्याच्या पहिल्या आठवड्यात देण्यात येणार आहे. लॉकडाउन लागू झाल्यापासून आरोग्य स्वयंसेविकांनी जेवढे दिवस काम केले त्या प्रत्येक दिवसासाठी ३०० रुपये एवढे अतिरिक्त मानधन दिले जाणार आहे. ही रक्कमदेखील त्यांना मे महिन्यात दिल्या जाणाºया एप्रिल महिन्याच्या मानधनासोबतच दिली जाणार आहे़

टॅग्स :कोरोना वायरस बातम्यामहाराष्ट्रात कोरोना व्हायरस