मुंबई : महाराष्ट्र सागरी मंडळाच्या (एमएमबी) वतीने निर्मल सागर तट अभियानांतर्गत राज्यभरातील किनाºयाची स्वच्छता करण्यात येत आहे. या अभियानांतर्गत नुकतेच काशिद येथील समुद्र किनाºयावरून ४ टन कचरा वेचण्यात आला. एमएमबी अधिकारी-कर्मचाºयांसह १५० विद्यार्थी आणि अदिवासी ग्रामस्थांनी या अभियानात सहभाग घेतला.राज्याच्या किनाºयावरील ग्रामस्थांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून देत, त्यांना अभियानात सहभागी करण्यात यावे, असे आदेश संबंधितांना एमएमबीकडून देण्यात आलेले आहेत. या धर्तीवर राज्यातील प्रादेशिक बंदर अधिकारी, आपल्या कक्षेतील किनाºयावर निर्मल सागर तट अभियानांर्तगत स्वच्छता मोहीम राबवित आहेत. काशिद किनाºयावरील प्लॅस्टिक, पाण्याच्या बाटल्या आणि तत्सम वस्तू, असा तब्बल ४ टन कचरा वेचण्यात आला. या वेळी परिसरातील १५० विद्यार्थी, १०० अदिवासी समाजातील ग्रामस्थ, सरपंच, ग्रामसेवक, एमएमबीचे अधिकारी-कर्मचाºयांसह एकूण ३०० लोकांनी सहभाग घेतला.किनाºयावरील ग्रामस्थांना या अभियानाची माहिती देण्यात आली. त्याचबरोबर, स्वच्छेतेचे महत्त्व पटवून देण्यात आले. किना-यांचे संवर्धनासह पर्यटकांना नेमक्या कोणत्या सोयी पुरविल्या, तर पर्यटक आकर्षित होतील, याबाबत ग्रामस्थांमध्ये जनजागृती या वेळी करण्यात आली.
काशिद किना-यावरील चार टन कचरा उचलला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 05, 2017 2:42 AM