लॅब टेक्निशियनच्या सतर्कतेमुळे सापडला चाेर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2021 04:07 AM2021-05-12T04:07:04+5:302021-05-12T04:07:04+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : केईएम रुग्णालयातील लॅब टेक्निशियनच्या सतर्कतेमुळे मंगळवारी चोराला पकडता आले. कादर बादशाहा शेख (२०) ...

Four were found due to the vigilance of the lab technician | लॅब टेक्निशियनच्या सतर्कतेमुळे सापडला चाेर

लॅब टेक्निशियनच्या सतर्कतेमुळे सापडला चाेर

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : केईएम रुग्णालयातील लॅब टेक्निशियनच्या सतर्कतेमुळे मंगळवारी चोराला पकडता आले. कादर बादशाहा शेख (२०) असे चाेराचे नाव असून, ताे मोबाइल चोरून पसार होत असताना त्याला पकडून भाेईवाडा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

काळाचौकी परिसरात राहणारे सचेत पवार (२१) हे केईएम रुग्णालय येथील इंडो क्राईम लॅबमध्ये लॅब टेक्निशियन आहेत. मंगळवारी सकाळी लॅबमध्ये मोबाइल चार्जिंगला लावून ते बाहेर काम करत हाेते. तासाभराने मोबाइल घेण्यासाठी ते लॅबमध्ये गेले असता तेथे माेबाइल नव्हता. दरम्यान, तेथे एका अनोळखी व्यक्तीला पाहताच त्यांनी त्याला हटकले. तो पळून जाण्याचा प्रयत्न करू लागला. अन्य सहकाऱ्यांच्या मदतीने त्याला पकडून सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या ताब्यात दिले आणि मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षात कॉल केला.

घटनेची माहिती मिळताच भोईवाडा पोलीस तेथे दाखल झाले. त्यांनी तरुणाला ताब्यात घेऊन त्याची झडती घेतली असता, त्याच्याकडे दोन मोबाइल सापडले. यापैकी एक पवार यांचा होता. शेख हा पी. डिमेलो रोडवरील झोपडपट्टीत राहताे. त्याच्यावर चोरीचा गुन्हा नोंदवत अटक करण्यात आली आहे.

....................................

Web Title: Four were found due to the vigilance of the lab technician

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.