Join us  

चौदा वर्षाच्या मिधांश गुप्ता याने 'हॅक' न होणारे ईव्हीएम बनवले, ब्लॉक चेन वर आधारित बनविली ईव्हीएम प्रणाली  

By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2024 8:18 PM

Mumbai News: प्रधानमंत्री राष्ट्रीय पुरस्काराने गौरविलेल्या चौदा वर्षीय मिधांश कुमार गुप्ता या विद्यार्थ्याने ब्लॉक चेनवर आधारित इलेक्ट्रीक वोटिंग मशीन ( ईव्हीएम ) विकसित केले आहे. त्याचे प्रात्यक्षिक  मिधांश याने मंगळवारी प्रेस क्लब येथे केले.

- श्रीकांत जाधव मुंबई - प्रधानमंत्री राष्ट्रीय पुरस्काराने गौरविलेल्या चौदा वर्षीय मिधांश कुमार गुप्ता या विद्यार्थ्याने ब्लॉक चेनवर आधारित इलेक्ट्रीक वोटिंग मशीन ( ईव्हीएम ) विकसित केले आहे. त्याचे प्रात्यक्षिक  मिधांश याने मंगळवारी प्रेस क्लब येथे केले. त्याच्या ईव्हीएममध्ये केलेले  मतदान कोणीही हॅक करू शकत नाही, असा दावा ही मिधांश गुप्ता यांनी केला आहे. 

मूळचे पंजाब राज्यातील मिधांश कुमार गुप्ता यांनी आपल्या आईवडिलासमवेत मंगळवारी प्रेस क्लब येथे माध्यमांशी संवाद साधला.  मिधांश याने ९ इयत्तेत शिकत असताना ब्लॉक चेन आधारित ईव्हीएम विकसित केले. जे फक्त प्रथमच विकसित केले गेले आहे.  या ईव्हीएममध्ये केलेल्या मतदानाची वेगळी पावती मतदाराला मिळते. शिवाय ती कोड भाषेत असल्याने मतदान कोणाला केले हे लगेच कळत नाही. मात्र कोणत्याही निवडणूक कार्यालयात ते तपासण्याची व्यवस्था होऊ शकते असे मिधांश यांचे म्हणणे आहे.  विशेष म्हणजे ब्लॉक चेन प्रणाली असल्याने कोणाचेही मतदान हॅक करणे शक्य नाही. तसा प्रयत्न जरी झाला तरी इतर निवडणूक कार्यालयातील संगणकांवर ते तपासणे शक्य होईल असे मिधांश यांनी सांगितले. 

टॅग्स :मुंबईईव्हीएम मशीन