मुंबई : अंधेरी पुलावर मोटारसायकल अडवून १४ लाखांची लूट करण्यात आली होती. या प्रकरणी अंधेरी पोलिसांनी शुक्रवारी चौघांच्या मुसक्या आवळल्या असून, त्यांची कसून चौकशी सुरू आहे.अंधेरीत ३० आॅक्टोबर रोजी हा प्रकार घडला होता. वांद्रे येथील चेकमेट कंपनीचे कर्मचारी १४ लाख ३४ हजार ९८५ रुपयांची बॅग घेऊन अंधेरीच्या दिशेने निघाले होते. तेव्हा चार मोटारसायकलस्वारांनी त्यांना अडवत त्यांची बॅग हिसकावून पळ काढला. या प्रकरणी अंधेरी पोलिसांच्या चार पथकांनी चौकशी करत चार चोरांच्या मुसक्या आवळल्या.त्यांच्याकडून अडीच लाख रुपये हस्तगत करण्यात आले आहेत. या चौघांव्यतिरिक्त आणखी काही लोकांचा यात समावेश असल्याचा संशय पोलिसांना आहे.
हायवेवरील दरोड्याप्रकरणी चौघांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2017 6:23 AM