अनधिकृत बांधकामप्रकरणी चौघांना अटक

By admin | Published: October 25, 2015 04:27 AM2015-10-25T04:27:34+5:302015-10-25T04:27:34+5:30

दिघा येथील अनधिकृत बांधकामांप्रकरणी पोलिसांनी चौघांना अटक केली आहे. अनधिकृत इमारती उभारून बनावट कागदपत्राद्वारे रहिवाशांची फसवणूक केल्याप्रकरणी

Fourth arrest in unauthorized construction | अनधिकृत बांधकामप्रकरणी चौघांना अटक

अनधिकृत बांधकामप्रकरणी चौघांना अटक

Next

नवी मुंबई : दिघा येथील अनधिकृत बांधकामांप्रकरणी पोलिसांनी चौघांना अटक केली आहे. अनधिकृत इमारती उभारून बनावट कागदपत्राद्वारे रहिवाशांची फसवणूक केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल होता.
रबाळे एमआयडीसी पोलीस ठाण्यात पांडुरंग अपार्टमेंट, शिवराम अपार्टमेंट व केरू प्लाझा या अनधिकृत इमारतीमध्ये घरे विकत घेऊन फसवणूक झालेल्या रहिवाशांनी विकासकांविरोधात तक्रार केली. त्यानुसार १० जणांविरोधात गुन्हा दाखल केला. त्यानुसार शनिवारी दुपारी पोलिसांनी चौघांना अटक केल्याचे पोलीस उपायुक्त शहाजी उमाप यांनी सांगितले. रमेश खारकर, किशोर भोईर, नितेश मोकाशी व मुकेश मढवी अशी नावे असून त्यांना रविवारी न्यायालयापुढे हजर केले जाणार आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Fourth arrest in unauthorized construction

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.