मणप्पुरमवरील दरोड्यात चौघे
By Admin | Published: December 28, 2016 01:31 AM2016-12-28T01:31:51+5:302016-12-28T01:31:51+5:30
मणप्पुरम गोल्ड फायनान्स कंपनीच्या कार्यालयावर वॉचमनसह ४ जणांनी दरोडा घातल्याचे सीसीटीव्ही फुटेज प्राप्त झाले असून आरोपींना जेरबंद करण्याकरिता पोलिसांची
उल्हासनगर : मणप्पुरम गोल्ड फायनान्स कंपनीच्या कार्यालयावर वॉचमनसह ४ जणांनी दरोडा घातल्याचे सीसीटीव्ही फुटेज प्राप्त झाले असून आरोपींना जेरबंद करण्याकरिता पोलिसांची सहा पथके राजस्थान, झारखंड आदी ठिकाणी रवाना झाल्याचे पोलीस उपायुक्त सुनील भारद्वाज यांनी सांगितले.
कंपनीचे कर्मचारी आणि दरोडेखोर यांच्या संगनमताने सोने व रोकड लुटली गेल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. लालचक्की येथील मणप्पुरम कंपनीचे लॉकर तोडून ३२ किलो सोन्याचे दागिने व रोख रक्कम दरोडेखोरांनी लंपास केले. प्रारंभी ‘शंकरकृपा पॅलेस’ इमारतीचा वॉचमन करण थापा याने बदली म्हणून ठेवलेल्या अनोळखी वॉचमनने कंपनीच्या भिंतीला भोक पाडून दरोडा टाकल्याचे बोलले जात होते. मात्र पोलिसांकडील फुटेजमध्ये चौघे गॅस कटरने लॉकर तोडताना दिसत आहेत. (प्रतिनिधी)