स्त्रियांवरील अत्याचाराविरोधात चारचौघींचा लढा..!
By admin | Published: November 13, 2014 10:49 PM2014-11-13T22:49:58+5:302014-11-13T22:49:58+5:30
समाजात स्त्रियांवर होणा:या अत्याचारांच्या विरोधात विविध स्तरावरून आवाज उठविला जातो. अनकेदा ‘कँडल मार्च’च्या माध्यमातून अशा घटनांचा निषेध केला जातो.
Next
समाजात स्त्रियांवर होणा:या अत्याचारांच्या विरोधात विविध स्तरावरून आवाज उठविला जातो. अनकेदा ‘कँडल मार्च’च्या माध्यमातून अशा घटनांचा निषेध केला जातो. परंतु यातून अत्याचार झालेल्या स्त्रीला न्याय मिळतो का, हा प्रश्न नेहमीच चर्चेत राहिला आहे. याच विषयाला चित्रपटासारख्या प्रभावी माध्यमाद्वारे वाचा फोडण्याचा विडा अभिनेत्री स्मिता तांबे, तेजस्विनी पंडित, मनवा नाईक आणि सायली सहस्त्रबुद्धे यांनी उचलला आहे. ‘कँडल मार्च’ या मराठी चित्रपटाद्वारे या चारचौघी हा लढा लढण्यास सज्ज झाल्या आहेत. या निमित्ताने या चौघी जणींनी त्यांची रोखठोक मते मांडली.
स्मिता तांबे : एखादी अत्याचाराची घटना घडली की आपण केवळ एखादा व्हॉट्सअप पाठवून किंवा फेसबुकवर लिंक शेअर करून भावना प्रकट करतो. म्हणजे आपण फक्त प्रतिक्रिया व्यक्त करण्यात धन्यता मानतो. आपले आयुष्य आता केवळ प्रतिक्रियात्मक झाले आहे. पण अन्यायाला वाचा फोडणो अधिक महत्त्वाचे आहे. स्त्रीवरील अत्याचाराचा प्रसंग पाहून मी थिजून गेले होते, मग एखादय़ा मुलीवर जेव्हा अत्याचार होतो, तेव्हा तिचे काय होत असेल? अशा प्रकारच्या सामाजिक प्रश्नावर मी एक अभिनेत्री म्हणून जोडले गेले.
तेजस्विनी पंडित : समाजात स्त्रियांवर होणारे अत्याचार पाहता समाजाने आपली विचारसरणी बदलली पाहिजे असे वाटते. स्त्री अत्याचारावरील हा चित्रपट असला तरी यात स्त्रियांची बाजू पुरूषांनी मांडली आहे, हे महत्त्वाचे आहे. पुरूषाच्या शारीरिक बलाला स्त्री मानसिकदृष्टय़ा मोडून काढू शकतो. पुरूषांनी केलेला शारीरिक अत्याचार त्याला स्त्रीने केलेला मानसिक विरोध या चित्रपटात आहे. हा चित्रपट करताना मला विषयाची दाहकता प्रकर्षाने जाणवत होती.
मनवा नाईक : स्त्रियांचे होणारे शोषण आपल्यासमोर विविध घटकांतून येते. त्याबद्दल मनात राग असतो, पण तो व्यक्त करायचा कसा, हे आपल्याला माहीत नसते, किंवा राग व्यक्त करायला आपल्याला भीती वाटते. स्त्रियांवरील अत्याचार हा घराघरातील प्रश्न आहे आणि त्याविरूद्ध आवाज उठवायलाच पाहिजे. स्त्रीवर होणारा अत्याचार हा तिच्या शरीरावरच नव्हे, तर मनावरही होत असतो. स्त्रियांकडे वाईट नजरेने बघणो, शिट्टया मारणो, घाणोरडे जोक्स पाठविणो हे सगळे प्रकार म्हणजे अत्याचारच आहे.
सायली सहस्त्रबुद्धे : पुरूषप्रधान संस्कृतीत वर्षानुवर्षे चालत आलेल्या समजुतीतून स्त्रियांवरचे अत्याचार घडतात. पुरूषप्रधान संस्कृती आणि स्त्रीकडे बघण्याचा दृष्टिकोन हे एकमेकात गुंतलेले आहे. समाजात अत्याचारित मुलीचे पुढे काय होते; समाजात तिला कशी वागणूक मिळते, तिच्या घरातून तिला धीर मिळतो का, हे प्रश्न याबाबत महत्त्वाचे ठरतात. समाजाच्या एकूणच विचारपध्दतीत बदल होणो आवश्यक आहे.