Join us

Coronavirus: महाराष्ट्रात कोरोनाचा आणखी एक बळी; 65 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2020 12:28 PM

65 वर्षीय व्यक्तीस ताप, खोकला आणि श्वसनाचा त्रास होत असल्यामुळे 23 मार्च रोजी कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.

मुंबईः कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. आता कोरोनाचा मुंबईत आणखी एक बळी गेला आहे. 65 वर्षीय व्यक्तीस ताप, खोकला आणि श्वसनाचा त्रास होत असल्यामुळे 23 मार्च रोजी कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. सदर व्यक्ती 15 मार्चला यूएईवरून प्रवास करून अहमदाबाद येथे आली होती. त्यानंतर 20 मार्चला ती व्यक्ती मुंबईत आली, त्या व्यक्तीला उच्च रक्तदाब आणि मधुमेहाचा त्रास होता. रुग्ण गंभीर असल्याकारणानं उपचारादरम्यान 23 मार्चच्या संध्याकाळी त्याचा मृत्यू झाला. त्या रुग्णाचे कोरोना चाचणीचे रिपोर्टही पॉझिटिव्ह आले होते, अशी माहिती मुंबई महापालिकेनं दिली आहे. राज्यात कोरोनाचा हा तिसरा बळी असून, देशात कोरोनानं दगावलेली ही 10वी व्यक्ती आहे.  

Coronavirus : महाराष्ट्रासह देशातील ‘या’ 30 राज्य-केंद्रशासित प्रदेशात 'लॉकडाऊन'

सोमवारी मुंबईत कोरोनानं फिलिपिन्सवरून आलेल्या 68 वर्षीय व्यक्तीचा खासगी रुग्णालयात मृत्यू झाला होता. त्याला कस्तुरबा रुग्णालयातून खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्या रुग्णाला मधुमेह आणि दम्याचा त्रास होता. 13 मार्चला त्याच्यात कोरोनाची लक्षणं आढळल्यानं त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. कोरोनाचं निदान झाल्यानंतर मूत्रपिंड आणि श्वसनाचा त्या रुग्णाचा त्रास अधिक तीव्र झाला होता. तिथेच त्याचा मृत्यू झाला होता.  coronavirus : राज्यात कोरोना बाधितांची संख्या 101वर, आणखी चार रुग्णांची भरराज्यात कोरोनानं आतापर्यंत 101 बाधित असल्याचं समोर आलं आहे.  सातारा 1, पुणे 3 अशा 4 नव्या रुग्णांची नोंद झाली असून, राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 101वर गेला आहे. पुण्यात नवीन 3 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले असून, एक सह्याद्री, एक दीनानाथ व एक नायडू हॉस्पिटलमध्ये दाखल आहेत. दरम्यान काल राज्यातील 8 जणांना कोरोनाची बाधा झाल्याची माहिती समोर आली होती. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 97वर पोहोचली होती. सांगलीत 4, मुंबईत 3 आणि साताऱ्यात एका व्यक्तीला कोरोनाचा संसर्ग झाल्याची नोंद झाली होती. सांगलीत आढळून आलेले चार कोरोनाबाधित सौदी अरेबियावरून आल्याची माहिती मिळाली होती.दरम्यान काल राज्यातील 8 जणांना कोरोनाची बाधा झाल्याची माहिती समोर आली होती. त्यामुळे राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 97वर पोहोचली होती. सांगलीत 4, मुंबईत 3 आणि साताऱ्यात एका व्यक्तीला कोरोनाचा संसर्ग झाल्याची नोंद झाली होती. सांगलीत आढळून आलेले चार कोरोनाबाधित सौदी अरेबियावरून आल्याची माहिती मिळाली होती.कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी राज्य सरकारनं काही महत्त्वाचे निर्णय घेतले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी काल संध्याकाळी जनतेशी संवाद साधत राज्यात संचारबंदी लागू करत असल्याची माहिती दिली. त्याआधी राज्यात जमावबंदी लागू होती. मात्र तरीही अनेक जण रस्त्यानं प्रवास करत असल्यानं, एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जात असल्यानं संचारबंदीचा निर्णय घेण्यात आला. सर्व जिल्ह्यांच्या सीमा बंद करण्यात येत असल्याची माहितीदेखील मुख्यमंत्र्यांनी दिली. परिस्थिती सध्या धोकादायक वळणावर असून सर्वांनी घरीच राहावं असं कळकळीचं आवाहन त्यांनी पुन्हा एकदा राज्यातल्या जनतेला केलं.

महत्त्वाच्या बातम्या

Coronavirus : कोरोनाला रोखणं आता तुमच्या हाती! WHO ने केलं भारताचं कौतुक

Coronavirus: आईच्या मृत्यूनंतरही डॉक्टरने बजावलं कर्तव्य; कोरोनाग्रस्तांचा जीव वाचवण्यासाठी हॉस्पिटला पोहचले 

coronavirus : कोल्हापुरात कोरोना संशयिताचे रुग्णालयातून पलायन

Coronavirus : राज्यभर संचारबंदी लागू;जिल्ह्यांच्या सीमाही सील 

टॅग्स :कोरोना वायरस बातम्यामहाराष्ट्रात कोरोना व्हायरस