मुंबई : पूर्व द्रुतगती मार्गावरील मुलुंड ते ऐरोली परिसरात रविवारी पहाटेच्या सुमारास झालेल्या अपघातात कोल्ह्याचा (गोल्डन जॅकेल) मृत्यू झाला. जलद गतीने धावणाऱ्या वाहनांच्या धडकेत कोल्हा मार्गावर जखमी अवस्थेत पडला. त्यानंतर, त्याच्यावरून दोन ते तीन वाहने गेल्याने त्याचा मृत्यू झाला, असे रॉ संस्थेचे संस्थापक पवन शर्मा यांनी सांगितले.स्थानिकांनी मार्गावर मृत अवस्थेत पडलेल्या कोल्ह्याला पदपथावर आणत, याची माहिती वनविभाग आणि रॉ संस्थेला फोनवरून दिली. वनविभागाने कोल्ह्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी ताब्यात घेतला. दरम्यान, मुंबईच्या उपनगरांमध्ये कोल्ह्यांचा वावर वाढत आहे, असे शर्मा यांनी सांगितले.
वाहनांच्या धडकेत कोल्ह्याचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 09, 2018 5:54 AM