- नारायण जाधव
ठाणे : चटईक्षेत्र चोरून कोट्यवधींची लूट करून रहिवाशांची फसवणूक करणाऱ्या विकासकांना नवी मुंबई महापालिका, एन. रामास्वामी यांनी मोठा दणका दिला आहे. अशाच प्रकारे चटईक्षेत्राची चोरी करणे नवी मुंबईतील घणसोली नोडमधील सर्वात उत्तुंग इमारत अशी ओळख सांगणाºया अॅटलान्टिस टॉवरच्या विकासकाला चांगलेच महागात पडले आहे.
वारेमाप अनधिकृत बांधकामे केल्यामुळे तो टॉवरच अनधिकृत ठरवून नवी मुंबई महापालिकेने त्यामधील घरे आणि दुकाने खरेदी करूनयेत, असे आवाहन केले आहे. महापालिकेने याबाबत स्थनिक पोलीसांत एमआरटीपी कायद्यान्वये तक्रार केली.
राज्यात नव्याने अनधिकृत बांधकामे होऊ नयेत, त्यात घरे घेऊन सर्वसामान्यांची फसवणूक होऊ नये, म्हणून अशा बांधकामांच्या याद्या संबंधित स्थानिक स्वराज्य संस्था, सिडको, म्हाडा, एमएमआरडीए यासारख्या नियोजन प्राधिकरणांनी दुय्यम निबंधकांकडे द्याव्यात, तसेच त्या आपल्या संकेतस्थळांवर आणि वृत्तपत्रांत प्रसिद्ध करण्याचे आदेश नगरविकास विभागाने ३ मे २०१८ रोजी दिले. त्यानुसार, अॅटलान्टिसविरोधात आलेल्या तक्रारीवरून नवी मुंबई महापालिकेने विकासकाला दणका दिला आहे. नगरविकासच्या या आदेशानुसार अशी बांधकामे तोडून टाकण्यासाठी नोटिसा बजावून भूमाफियांनी न्यायालयात जाऊन स्थगिती मिळवण्याची संधी मिळू नये, याकरिता न्यायालयात लगेच कॅव्हेट दाखल करण्यास सांगितले होते.
काय आहे प्रकारअॅटलान्टिस हा नवी मुंबईतील घणसोली नोडमधील सेक्टर ११ मधील प्लॉट नंबर ५ वरील ३४ माळ्यांचा टॉवर असून १२ हजार चौरस मीटर भूखंडावर तो तीन विंगमध्ये बांधला आहे. त्यात २५८ सदनिका आणि १६ दुकाने आहेत. मात्र, त्याचे विकासक बी अॅण्ड एम बिल्डकॉन यांनी बांधकाम करताना चटईक्षेत्राची वारेमाप चोरी केली आहे. यात कपाटे बांधलेली नाहीत. दिलेल्या टेरेसचे रूपांतर बेडरूममध्ये केले आहे. फ्लॉवरबेडमध्ये बाल्कनीचे बांधकाम केले आहे. तसेच मंजूर नकाशापेक्षा मोठे टेरेस बांधले आहे. यामुळे पालिकेने विकासकाला एमआरटीपी कायद्यान्वये नोटीस बजावली आहे. याबाबत तक्रार दिली, तरी पोलिसांनी अद्याप गुन्हा दाखल केलेला नाही.नगररचना अधिकारी मोकाटअॅटलान्टिस टॉवरमध्ये विकासकाने सुमारे ३० ते ४० टक्के अतिरिक्त चटईक्षेत्राची चोरी केलेली असतानाही त्यास सीसी/ओसी देणाºया नवी मुंबई महापालिकेच्या नगररचना खात्याच्या संबंधित अधिकाºयांनी हरकत घेतलेली नाही. उलट, बिनदिक्कत ओसी देऊन त्यात घरे, दुकाने घेणाºयांची फसवणूक करण्यात विकासकास हातभार लावला आहे. परंतु, पालिका प्रशासनाने त्यांना मोकाट सोडले आहे. यामुळे त्यांच्यावर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते संजयकुमार सुर्वे यांनी आयुक्तांकडे केली आहे.