Join us

फंडाच्या नावाखाली दाम्पत्याकडून फसवणूक

By admin | Published: May 03, 2015 11:07 PM

मासिक फंड चालविण्याच्या नावाखाली अनेक महिलांकडून प्रति महिना पाचशे रुपये घेऊन हजारो रुपयांची फसवणूक करणाऱ्या सुवर्णा आणि जनार्दन

ठाणे : मासिक फंड चालविण्याच्या नावाखाली अनेक महिलांकडून प्रति महिना पाचशे रुपये घेऊन हजारो रुपयांची फसवणूक करणाऱ्या सुवर्णा आणि जनार्दन अवताडे या दांम्पत्याविरुद्ध कापूरबावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जानेवारी २०१४ पासून त्यांनी या महिलांकडून पैसे उकळल्यानंतर ते पसार झाले आहेत.मनोरमा नगरच्या अशोकनगर भागात हे दांम्पत्य दर महिन्याला भिशी चालवित होते. त्यांनी १२ महिन्यात साडे सात हजार रुपये देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र त्यांनी ते न देता त्याबदल्यात जादा व्याज देण्याचे मान्य केले. तेही न देता टाळाटाळ करुन पलायन केले. याप्रकरणी रेवती यादव यांनी कापूरबावडी पोलीस ठाण्यात २ मे रोजी तक्रार दाखल केली असून अवताडे दाम्पत्याचा शोध घेण्यात येत असल्याचे पोलीसांनी सांगितले. अशा प्रकारच्या भिशीमध्ये नागरिकांनी पैसे जमा करू नयेत असे आवाहन पोलिसांनी केले आहे. (प्रतिनिधी)