भरघोस व्याज देण्याच्या आमिषाने कोटीची फसवणूक, गुन्हा दाखल : तिन्ही आरोपी फरार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2018 01:45 AM2018-02-12T01:45:54+5:302018-02-12T01:46:03+5:30

गुंतवणुकीच्या रकमेवर भरघोस व्याज देण्याचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांची सुमारे १ कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी मंदार मास्टर, रोहित उचिल आणि किरण ऐल या त्रिकूटाविरुद्ध टिळकनगर पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

Fraud fraud, cheating of the accused, filing of complaint: Three accused absconding | भरघोस व्याज देण्याच्या आमिषाने कोटीची फसवणूक, गुन्हा दाखल : तिन्ही आरोपी फरार

भरघोस व्याज देण्याच्या आमिषाने कोटीची फसवणूक, गुन्हा दाखल : तिन्ही आरोपी फरार

Next

मुंबई : गुंतवणुकीच्या रकमेवर भरघोस व्याज देण्याचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांची सुमारे १ कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी मंदार मास्टर, रोहित उचिल आणि किरण ऐल या त्रिकूटाविरुद्ध टिळकनगर पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. सध्या हे तिन्ही आरोपी फरार आहेत.
विक्रोळी (पूर्व) येथील कन्नमवारनगरमध्ये राहणाºया उत्तमराव हुंडारे यांच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हुंडारे यांच्या सेवानिवृत्त मित्राने तीन वर्षांपूर्वी घाटकोपर येथील फॉर इन्व्हेस्टमेंट कन्सल्टंट एलएलपीचा संचालक मंदार मास्टर याच्याशी ओळख करून दिली होती. या कंपनीचे पूर्वीचे नाव मंदार मास्टर अ‍ॅण्ड कंपनी प्रा. लि. असे होते. मंदार हा शेअर मार्केटमध्ये काम करीत असून तो त्याच्याकडे गुंतवलेल्या रकमेवर दरमहा दहा टक्के व्याज देतो, असे मित्राने सांगितल्याने हुंडारे यांनी आपल्या कुटुंबीयांची ९९ लाख ५0 हजार रुपये इतकी रक्कम या कंपनीत गुंतवली.
काही काळ व्याज दिल्यानंतर आरोपींनी व्याज देणे बंद केले. त्यानंतर त्यांनी कार्यालयात येणेही बंद केले. बराच पाठपुरावा केल्यानंतर आरोपींनी हुंडारे यांना पुढील तारखेचे धनादेश दिले. तेही न वठता परत आले. पोलिसात दिलेली तक्रार मागे घेण्यासाठी आरोपींनी आपणास ठार मारण्याची धमकी दिल्याचेही हुंडारे यांनी तक्रारीत म्हटले आहे.

Web Title: Fraud fraud, cheating of the accused, filing of complaint: Three accused absconding

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.