मुंबई : विमा पॉलिसीवर चांगले फायदे मिळवून देण्याच्या नावाखाली चौकडीने ६४ वर्षीय जीवन शेनॉय यांची सव्वा चौदा लाखांना फसवणूक केल्याचा प्रकार दहिसरमध्ये उघडकीस आला आहे. याप्रकरणी दहिसर पोलिसांनी चौघांविरुद्ध फसवणूक तसेच तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. दहिसर पूर्वेकडील परिसरात शेनॉय कुटुंबासह राहतात. गेल्या वर्षीच्या जानेवारीत ठगांनी मोबाइलवरुन त्यांच्याशी संपर्क साधला. त्यांच्या विमा पॉलिसीवर विविध फायदे मिळवून देण्याचे अमीष दाखवून त्यांच्याकडून १४ लाख २५ हजार रुपये उकळले. पैसे भरुनही काहीच माहिती न मिळाल्याने त्यांनी पोलिसांत धाव घेतली. पोलस अधिक तपास करीत आहेत.
पॉलिसीच्या नावाने वृद्धाची फसवणूक
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 11, 2018 05:14 IST