Join us

सवलतींच्या आमिषाने विमाधारकांची फसवणूक

By ऑनलाइन लोकमत | Published: October 09, 2020 6:11 PM

Fraud of insured : सतर्क राहण्याच्या आयआरडीएआयच्या सूचना

मुंबई : कोरोना संकटाच्या काळात विमा काढण्यासाठी अनेकांचे प्रयत्न सुरू असताना विमा पाँलिसीवर सवलती देण्याचे आमिष दाखवून फसवणूक करणा-यांचा सुळसुळाट झाला आहे. त्याबाबतच्या अनेक तक्रारी इश्युरन्स रेग्युलेटरी अथाँरीटी आँफ इंडियाकडे (आयआरडीएआय) दाखल झाल्या आत. त्यामुळे अधिकृत विमा कंपनी आणि एजंटच्या माध्यमातूनच पॉलिसी काढून फसवणूक टाळा असे आवाहन करण्यात आले आहे.   

सवलतीच्या दरांमध्ये वैद्यकीय तपासण्या आणि आरोग्य विमा काढून देण्यासाठी काही अनधिकृत व्यक्ती किंवा संस्था प्रयत्न करत असल्याचे निदर्शनास आले आहे. परंतु, अशा पद्धतीने पॉलिसी देण्याचे अधिकार फक्त ‘आयआरडीएआय’कडे नोंदणीकृत असलेल्या कंपन्या आणि त्यांच्या अधिकृत प्रतिनिधींनाच आहे. त्या व्यतिरिक्त कुणाच्याही माध्यमातून लोकांनी पॉलिसी काढू नये. तशी पॉलिसी काढल्यास त्याच्या परिणामांची सर्वस्वी जबाबदारी पॉलिसीधारकावर असेल असा इशाराही देण्यात आला आहे. आयआरडीएआयने प्राधिकृत केलेल्या विमा कंपन्यांची यादी वेबसाईटवर उपलब्ध आहे. एखाद्या  त्याबाबतची खातरजमा करावी अशा सल्लाही देण्यात आला आहे.  

टॅग्स :धोकेबाजीगुन्हेगारीमुंबईपोलिस