आर्मीचा ऑफिसर असल्याचे सांगून लाखोंची फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2021 04:05 AM2021-08-12T04:05:59+5:302021-08-12T04:05:59+5:30
मुंबई : आर्मीचा ऑफिसर असल्याचे सांगून एक लाखांची फसवणूक करण्यात आल्याची घटना गावदेवी परिसरात घडली आहे. याप्रकरणी गावदेवी पोलीस ...
मुंबई : आर्मीचा ऑफिसर असल्याचे सांगून एक लाखांची फसवणूक करण्यात आल्याची घटना गावदेवी परिसरात घडली आहे. याप्रकरणी गावदेवी पोलीस ठाण्यात रविवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गिरगाव चौपाटी परिसरात राहणाऱ्या ६३ वर्षीय तक्रारदाराचा गँस सिलंडर पुरवठ्याचा व्यवसाय आहे. शुक्रवारी तक्रारदाराला अनोळखी क्रमांकावरून फोन करणाऱ्याने आपले नाव मनजित सिंग असून मी आर्मी ऑफिसर असल्याचे सांगितले. आर्मी कॅम्पसाठी गॅसची १५ कमर्शियल सिलिंडर पाहिजे असल्याचे सांगून व्हॉट्सॲपवर माहिती पाठवली.
गुगल पे वरून व्यवहार करण्याच्या नावाखाली त्यांच्या खात्यातून ९२ हजार रुपये काढले. यात फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी व्यवहार थांबविले. याबाबत गावदेवी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करत तपास सुरू केला आहे.