कोविड चाचणीसाठी पैसे मागून फसवणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2021 04:05 AM2021-01-02T04:05:52+5:302021-01-02T04:05:52+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : लग्नाची बाेलणी करायला विदेशातून आल्यानंतर विमानतळावर कोविड चाचणी करायला सांगण्यात आले. मात्र, भारतीय चलन ...
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : लग्नाची बाेलणी करायला विदेशातून आल्यानंतर विमानतळावर कोविड चाचणी करायला सांगण्यात आले. मात्र, भारतीय चलन नाही, असे खाेटे सांगून एका भामट्याने भावी वधूकडेच पैसे मागून तिला सहा लाख रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार अंधेरीत उघडकीस आला.
पीडित या खासगी कंपनीत एचआर मॅनेजर असून, हार्दन गनबीर नामक व्यक्तीने तिला मेट्रिमोनियल साईटवर लग्नासाठी मागणी घातली. त्यानंतर लग्नाची बाेलणी करायला तिला भेटायला येत असल्याचे सांगितले. विमानतळावर कोरोनाची आरटीपीसीआर चाचणी करायला सांगितले असून, त्याच्याकडे भारतीय चलन नसल्याचे सांगितले. महिलेकडून या चाचणीसाठी जवळपास सहा लाख रुपये घेतले. मात्र, तरीही त्याने तिच्याकडे पुन्हा साडेतीन लाख रुपयांची मागणी केली. तेव्हा तिला संशय आल्याने तिने २६ डिसेंबर २०२० रोजी पोलिसांत धाव घेतली. त्यानुसार पाेलीस अधिक तपास करत आहेत.
.................................